India vs England Women Cricket: भारतीय महिला क्रिकेट टीमने (Indian Women Cricket Team) इंग्लंडला सीरिजच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये (ODI series) 88 धावांनी पराभूत करुन दणदणीत विजय मिळवला आहे. कँटरबरीमध्ये (Canterbury) झालेल्या सिरीजच्या दुसऱ्या वनडेमध्ये हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 143 धावांची नाबाद कामगिरी करुन सर्वांची मने जिंकली. या विजयामुळे भारतीय टीमने तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये 2-0 अभेद्य आघाडी घेतली.
भारतीय महिला क्रिकेट टीमने जवळपास 23 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आणली आहे. 1999 वर्षानंतर इंग्लंडच्या मैदानात यंदा पहिली वनडे सिरीज जिंकली आहे. इंग्लंडच्या वनडेमध्ये सर्वात जास्त द्विपक्षीय सिरीज जिंकण्याबाबतीत न्यूझीलंड सोबत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दोन्ही टीमने इंग्लंडच्या मैदानात आत्तापर्यंत दोनवेळा वनडे सिरीज जिंकली आहे.
हरमनप्रीतने 111 चेंडूमध्ये नाबाद 143 धावा केल्या. हा विक्रम करताना हमरनप्रीतने 18 चौके आणि 4 षटकार लगावले. याआधी इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलियाच्या डॅब हॉकलीच्या नावाने विक्रम नोंदवला गेला होता.
भारतीय टीमच्या हरमनप्रीत कौर व्यतिरिकत्त हरलीन देओलने देखील अर्धशतक करुन उत्तम कामगिरी केली आहे. हपलीनने 72 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2 षटकार लगावून 58 धावा केल्या. ओपनर स्मृति मंधनाने 51 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार लगावून 40 धावा केल्या. इंग्लंडच्या टीमने भारताविरुद्ध खेळताना 44.2 ऑवरमध्ये 245 धावांवर सर्वबाद झाले. डॅनियल वॉटने सर्वात जास्त 65 धावा केल्या. रेणूका सिंगने 57 धावा करताना चार खेळाडू बाद केले. डी हेमलताने देखील दोन खेळाडू बाद केले. या सीरिरचा तीसरा आणि शेवटचा वनडे सामना 24 सप्टेंबरला लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.