मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघ 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक 2022 (T20 world cup 2022) साठी गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झालाय. टीम इंडिया T20 विश्वचषक 2021 मधील कामगिरी विसरण्याचा प्रयत्न करेल जिथे ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. फायनल आणि लीग स्टेजमधून बाद झाले.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकून टीम इंडियाने आधीच आपला मनसुबा सिद्ध केलाय. मेन इन ब्लूला ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची उणीव भासणार असली तरी संघ व्यवस्थापन रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांच्यासारख्या फलंदाजीवर अवलंबून असेल. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) ट्विटरवर ईएसपीएन, क्रिकइन्फो द्वारे पोस्ट केलेल्या प्रश्नांपैकी एकाला मनोरंजक प्रतिसाद दिलाय.
ईएसपीएन, क्रिकइन्फोने एक पोस्ट केली आहे जिथे सामन्याच्या शेवटच्या षटकात 18 धावा करायच्या असतील तर कोणत्या फलंदाजाचा विचार करावा असा प्रश्न विचारण्यात आलाय. यामध्ये दिनेश कार्तिक, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड मिलर यांना पर्याय देण्यात आला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने 'हार्दिक पंड्या'ला त्याची पहिली निवड म्हणून सांगितले.
भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने आयपीएल 2022 मधील प्रभावी कामगिरीनंतर संघातील देखील चांगली कामगिरी केली आहे. एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याने त्याची ओळख निर्माण केलीये. त्याने अनेक सामने आपल्या बळावर जिंकवून दिले आहेत.