नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात? नाक टोचण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Nose Ring Worn On Left Side : भारतीय संस्कृतीत कान आणि नाक टोचणे हे महत्त्वाचे मानले जाते. जगात जरी हे फॅशन असेल पण यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आहे. नथ डाव्या नाकात का घातली जाते, यामागील कारण तुम्हाला माहितीये का?

नेहा चौधरी | Updated: Nov 20, 2024, 05:26 PM IST
नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात? नाक टोचण्यापूर्वी जाणून घ्या फायदे  title=
Why Nath is always worn on the left side of the nose Know the benefits before getting nose piercing

Nose Ring Worn On Left Side : जगभरात आजकाल कान आणि नाक टोचण्याची फॅशन झाली आहे. पण भारतीय संस्कृतीत कान आणि नाक टोचण्यामागे मोठी परंपरा आहे. तुम्ही पाहिलं असेल लग्नानंतर विवाहित महिला पायात पैंजण, जोडवे आणि नाकात नथ घालतात. यामागील कारण तुम्हाला माहितीये का? त्याशिवाय नथ कायम डाव्या कानात का घातली जाते. यामागे फॅशन नाहीतर धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. नाक टोचण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे फायदे. (Why Nath is always worn on the left side of the nose Know the benefits before getting nose piercing) 

नाकाची नथ फक्त डाव्या बाजूला का घातली जाते?

तुम्ही विवाहित महिलांना नाकाच्या डाव्या बाजूला नोज रिंग किंवा नथ घातलेल्या पाहिल्या असतील. असं मानलं जातं की नाकाचा डावा भाग महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित आहे. जेव्हा नाकात रिंग घालण्यासाठी छिद्र केले जाते तेव्हा ते मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं. 

नाकाची नथ घालण्याचे काय फायदे?

ज्योतिषशास्त्रानुसार नाकात नथ वैवाहिक जीवनात शक्ती प्रदान करते. विवाहित महिलेने शुभ प्रसंगी नाकात नथ घालणे शुभ लक्षण मानले जाते. हे केवळ विवाहित महिलांचे सौंदर्यच वाढवत नाही तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ज्योतिष शास्त्रात सोन्याची किंवा चांदीची नथ किंवा नोज रिंग घालणे शुभ मानले जाते.

आरोग्य फायदे

डाव्या बाजूला नाकात नथ घालण्यामागे काही वैज्ञानिक तथ्ये आहेत. शास्त्रानुसार, डाव्या बाजूला नथ घातल्याने मासिक पाळीच्या वेळी महिलांना होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. हे धारण केल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा धोकाही कमी होतो. त्यासोबतच आयुर्वेदानुसार नाकपुडी उघडण्याच्या जवळ मज्जातंतूंचे पुंजके असतात जेव्हा नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केले जाते तेव्हा या मज्जातंतू उत्तेजित होतात. गर्भाशयाला निरोगी बनवण्यात मदत होते. आपल्या शरीरात काही ऍक्युप्रेशर पॉईंट असतात, यापैकी डाव्या नाकावरील पॉईंट हा थेट प्रजनन प्रणालीशी जोडलेला असतो.

 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)