आफ्रिका दौऱ्याआधी गंभीरने टीम इंडियाला दिला सल्ला

टीम इंडियापासून बराच काळ बाहेर असणाऱ्या गौतम गंभीरने यासंदर्भात वक्तव्य केले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 21, 2017, 09:01 AM IST
आफ्रिका दौऱ्याआधी गंभीरने टीम इंडियाला दिला सल्ला

नवी दिल्ली : मायदेशात श्रीलंकेला मात दिल्यानंतर टीम इंडीया साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जात आहे.

तीनही फॉर्मेटमध्ये टीम इंडिया नंबर वन स्थानाच्या जवळ आहे. दरम्यान टीम इंडियापासून बराच काळ बाहेर असणाऱ्या गौतम गंभीरने यासंदर्भात वक्तव्य केले आहे. 

कोणत्याही परिस्थीतीत टीम इंडिया जगातील सर्वोत्तम स्थानी पोहोचली पाहिजे असे वक्तव्य टीम इंडियाचा खेळाडू गौतम गंभीरने केले आहे.

परदेशी दौऱ्याला सुरूवात  

टीम इंडिया २०१८ पासून परदेशी मैदानात आपल्या प्रदर्शनात अधिक सुधार आणण्याचा प्रयत्न करेल. त्याची सुरूवात ५ जानेवारी २०१८ पासून होणाऱ्या साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीजने होणार आहे.  त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया जाणार आहे.

तिथली परिस्थिती स्पिनर्ससाठी अनुकूल नाहीए. उसळणाऱ्या बॉल्ससमोर इंडीयाच्या बॅट्समनचीही परीक्षा असणार आहे. 

'कठीण परीक्षा'

 'ही कठीण परीक्षा असेल, दक्षिण आफ्रिका खासकरून स्वत:च्या मैदानात चांगला परफॉर्मन्स देते. त्यांना हरविण्यासाठी टीम इंडियाला चांगले प्रदर्शन करावे लागेल' असे गौतम गंभीर यांना सांगितले. त्यांच्याजवळ खूप चांगले बॉलर्स आहेत तसेच तगडे बॅट्समॅन आहेत.
 
 आफ्रिकेला हरवण्यासाठी भारताला खूप चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल असेही त्याने सांगितले. 

'आत्मविश्वासाने जा '

 गेल्या दोन वर्षातील चांगल्या प्रदर्शनामूळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. भलेही अधिक सामने घरच्या मैदानात खेळले असतील तरीही मोठ्या आत्मविश्वासानेच आफ्रिकेत जायला हवे असेही गंभीर म्हणाला.