England vs Australias, Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेसच्या (Ashes 2023) शेवटच्या सामन्याचा थरार आता आणखी वाढत चालला आहे. अखेरच्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी 249 धावांची गरज आहे, तर इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी 10 विकेट काढाव्या लागलीत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या स्वप्नांची राख करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मात्र, चौथ्या दिवसाच्या अखेरीस एक घटना पहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नश लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत असताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ज्यावेळी ड्रेसिंग रूमकडे जात होते, त्यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना डिवचलं. त्यावेळी त्यांना 'बोरिंग बोरिंग' असं म्हणत डिवचलं गेलं. ड्रेसिंग रूमकडे जात असताना उस्मानच्या कानावर हे शब्द पडले. त्यावेळी त्याला राग आला अन् त्याने फॅन्सला प्रत्युत्तर देण्यासाठी वाट मोडली. लाबुशेनने फॅनकडे रागात बघत तु काय बोलला? असा प्रश्न केला. लाबुशेनचा लुक पाहून इंग्लंडचा चाहता घाबरला. त्यावेळी त्याने माफी मागितली, तरी देखील लाबुशेनचा राग काही कमी झाला नाही. तू सर्व खेळाडूंसोबत असेच करणार होता, असं म्हणत लाबुशेन चांगलाच भडकला. त्यावेळी उस्मान ख्वाजाने मध्यस्ती केली आणि फॅन्सचा चांगलाच धडा शिकवला. त्याने ख्वाजाने आवरतं घेतलं आणि लाबुशेनला ड्रेसिंग रूमकडे घेऊन गेला.
Not quite the MCC Long Room at Lords. But @marnus3cricket and @Uz_Khawaja clearly not happy with this Englishman at the end of a frustrating day 3 for the Aussies! #boring #Ashes #ENGvsAUS pic.twitter.com/i0m5wM8bUY
— Pat McCormick (@pat_mccormickk) July 30, 2023
उस्मान ख्वाजा आणि लाबुशेनचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अॅशेस म्हणजे दोन्ही संघासाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे अनेकदा वाद होताना दिसतात. आता लाबुशेन आणि ख्वाजावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता आयसीसी कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात 283 धाव करत खराब सुरूवात केली. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात कांगारूंनी 295 धावा केल्या. तर इंग्लंडने दुसऱ्या डावात 395 धावा करत ऑस्ट्रेलियाला तगडं आव्हान दिलंय. आता ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आत्तापर्यंत कांगारूंनी 163 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडला आणखी 8 विकेटची गरज आहे.
इंग्लंडचा संघ: झॅक क्रॉली, बेन डकेट, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (C), जॉनी बेअरस्टो (WK), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन
ऑस्ट्रेलियाचा संघ: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (WK), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (C), जोश हेझलवूड, टॉड मर्फी