ICC Test Ranking Rohit Sharma: भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान (India vs West Indies) 20 जुलैपासून म्हणजे गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत आघाडी घेतली आहे.आता दुसरा सामना जिंकत वेस्टइंडिजला व्हाईटवॉश देण्यासाठी रोहितसेना सज्ज झालीय. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) खुशखबर आहे. आयसीसीने याबबात घोषणा केली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान डोमिनिकामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. आता दुसऱ्या कसोटीतही रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहते बाळगून आहेत.
रोहित शर्मासाठी खुशखबरी
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) मोठी झेप घेतली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत रोहित शर्माने टॉप10 मध्ये जागा मिळवली आहे. रोहित शर्मा 751 पॉईंटससह दहाव्या क्रमांकावर आहे. नव्या क्रमवारीत न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलिअम्स 883 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर ट्रेव्हिड दुसऱ्या आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये रोहि शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
डोमिनिकात शतकी खेळी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतलं हे त्याचं 10 वं शतक ठरलं. रोहितने 221 चेंडूत 103 धावा केला. या खेळीत रोहितने 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. रोहित शर्माने तब्बल 5 महिन्यांनंतर शतक केलं आहे. याआधी रोहितने 2023 फेब्रुवारीमध्ये बॉर्डर-गावस्कर मालकिते नागपूर कसोटीत शतक केलं होतं.
यशस्वीची रँकिंगमध्ये स्थान
दरम्यान, युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने कोसटी पदार्पणातच शतक करत विक्रम रचला. यशस्वीने 387 चेंडुत 171 धावा केल्या. या शतकाच्या जोरावर आयसीसी रँकिंगमध्ये यशस्वीने स्थान मिळवलं आहे. यशस्वी 73 व्या स्थानावर आहे. याशिवाय 11 व्या स्थानावर ऋषभ पंत तर 14 व्या स्थानावर विराट कोहली आहे. उपकर्णधार अजिंक राहाणे 41 व्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजीत अश्विन अव्वल
आयसीसी गोलंदाजांच्या क्रमावारीत भारताचा दिग्गज स्पीन बॉलर आर अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनने 12 विकेट घेतल्या होत्या. तर ऑलराऊंडरच्या यादीत टीम इंडियाच रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर आहेत. तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.