Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही काळात अनेक बदल झाले आहेत. टेस्ट आणि एकदिवसीय क्रिकेटनंतर टी20 फॉर्मेच आला. या फॉर्मेटने क्रिकेटमध्ये वेग आणि रोमांच आणला. इतकंच काय तर जगभरात टी20 क्रिकेटच्या अनेक लीग सुरु झाल्या. या लीगमध्ये विविध देशातील खेळाडू एकाच संघातून खेळू लागले. इंडियन प्रीमिअर लीगने टी20 क्रिकेट लीगाच पायंडा पाडला. आज अनेक देशात टी20 लीग खेळवलीजात असली तरी आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय टी20 क्रिकेटे प्रीमिअर लीग आहे.
एशिया इलेव्हन वि. वर्ल्ड इलेव्हन
तसं पाहिलं तर याआधी एशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन सामने आयोजित केले जायचे. 6 डिसेंबर 2014 मध्ये एशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन संघात शेवटचा सामना खेळवण्यात आला होता. यानंतर 2020 मध्ये बांगलादेशमध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण कोरोनामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना कधी आयोजित केला जाईल याची निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. पण विचार करा भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघातील सर्वोत्तम खेळाडूंचा एक क्रिकेट संघ बनवला तर तो संघ किती धोकादायक असेल.
अखंड भारताचा संघ
विराट कोहली आणि बाबर आझम आज एकाच संघात खेळत असते, तर क्रिकेटमध्ये चित्रच काहीसं वेगळं असतं. एशियातील या देशांमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू एकाच संघातून खेळत असते तर कदाचित या संघाला पराभूत करणं कोणत्याच संघाला शक्य झालं नसतं. वास्तविक हे शक्य नाही, पण आपण केवळ कल्पना केली तर. जाणून घेऊन सद्य परिस्थितीत कशी असती अखंड भारताची प्लेईंग 11
रोहित शर्मा
टीम इंडियाचा कर्णधार आणि धोकादायक फलंदाज म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन डबुल सेंच्युरी जमा आहेत. 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये हिटमॅनने तब्बल 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अखंड भारताच्या (Akhand Bharat) संघात रोहित शर्मा सलामीवीर म्हणून सहभागी केला जाईल.
बाबर आझम
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑल-टाइम फेव्हरेट खेळाडू म्हणजे बाबर आझम (Babar Azam). 29 वर्षांचा बाबर आज पाकिस्तानचा सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेवगान तीन हजार आणि पाच हजार धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. 117 एकदिवसीय सामन्यात बाबरच्या नावावर 5729 धावा जमा आहेत. यात 19 शतकांचा समावेश आहे. अखंड भारत संघात बाबर रोहितबरोबर दुसला सलामीवीर असता.
विराट कोहली
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्याचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 26 हजार धावा आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यातील 49 शतकांचा विक्रमही विराट कोहलीने मागे टाकला आहे. अखंड भारत संघात विराट कोहलीची तिसऱ्या स्थानावर जागा पक्की असती.
मोहम्मद रिझवान
अखंड भारत प्लेईंग-11 मध्ये चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) संधी मिळाली असती. रिझवानने 74 एकदिवसीय सामन्यात 40.1 च्या अॅव्हरेजने 2088 धावा केल्या आहेत. याशिवाय रिझवान सर्वोत्तम विकेटकिपरसुद्ध आहे.
शाकिब अल हसन
बांगलादेसचा महान खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib Hasan) अखंड भारत-11 मध्ये ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका पार पाडली असती. सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतरही डाव सावरण्यात शाकीब अल हसन माहिर आहे. वेगाने धावा जमवण्याचं तंत्र त्याच्याकडे आहे. शिवाय पॉवर प्लेमध्ये आणि डेथ ओव्हरमध्ये फायदेशीर गोलंदाजी करण्याचाही त्याला अनुभव आहे.
हार्दिक पांड्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळांडूंची यादी बनवली तर भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव सर्वात अव्वल स्थानी असेल. फलंदाजी आणि गोलंदाजीत हार्दिक पांड्याने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
राशिद खान
अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खान (Rashid Khan) वन डे क्रिकेटचा बेताज बादशाह आहे. आपल्या फिरकी गोलंदाजीने एकहाती सामना फिरवण्याची ताकद राशिद खानच्या फिरकी गोलंदाजीत आहे. अखंड भारत -11 मध्ये राशिदचा लेग स्पिनर म्हणून समावेश झाला असता.
वानिंदु हसरंगा
श्रीलंका क्रिकेट संघासाठी अवघ्या 51 एकदिवसीय सामन्यात 78 विकेट घेणारा वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) अखंड भारत-11 संघातील दुसरा फिरकी गोलंदाज असता. वानिंदुने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवली आहे.
शाहीन अफरीदी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान आणि धोकादायक गोलंदाज म्हणून पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीचा (Shaheen Afridi) दबदबा आहे. अवघ्या 23 वर्षांच्या शाहिन आफ्रिदीने 53 एकदिवीय सामन्यात 104 विकेट घेतल्या आहेत. यात तीन वेळा पाच विकेट घेण्याची त्याने कामगिरी केली आहे.
जसप्रीत बुमराह
अखंड भारत-11 संघाच्या वेगवान गोलंदाजीची प्रमुख धुरा असती ती भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah). भारतासाठी क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी केली आहे. वेग आणि यॉर्करचा बादशाह असलेल्या बुमराहसमोर भले-भले फलंदाज शरणागती पत्करातात.
मोहम्मद शमी
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या स्विंग गोलंदाजीने मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सर्वाधिक 25 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. शमीने भारतासाठी 101 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 195 विकेट घेतल्या आहेत. पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची किमया शमीने पाच वेळा केली आहे. आज अखंड भारत -11 संघात शमीची जागा प्लेईंग इलेव्हनमध्ये पक्की असती.
टीप - हा केवळ काल्पनिक अखंड भारत प्लेईंग इलेव्हनचा संघ आहे. असा संघ होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे.