महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे नेहमीच उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. आपल्या खेळाने प्रभावित करणाऱ्या खेळाडूंना आनंद महिंद्रा आपल्या कंपनीची प्रसिद्ध थार कार गिफ्ट करत, पाठीवर कौतुकाची थाप देतात. दरम्यान चेस वर्ल्ड कपमध्ये भारताचं नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर उज्ज्वल करणाऱ्या भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदलाही अशीच थार कार गिफ्ट करा अशी मागणी नेटकरी आनंद महिंद्रा यांच्याकडे करत आहेत. यावर आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत थार कारऐवजी दुसरा पर्याय सांगितला आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत प्रज्ञाननंदच्या पालकांना थारऐवजी इलेक्ट्रिक कार भेट म्हणून देणार असल्याची माहिती दिली आहे. आनंद महिंद्र यांनी यामागील कारणही सांगितलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी एका युजरने केलेल्या ट्विटवर उत्तर देताना सांगितलं आहे की "Krishlay तुमच्या भावनेची मी कदर करतो. तुमच्यासारखे बरेच जण मला प्रज्ञाननंदला एक थार भेट देण्याचा आग्रह करत आहेत. पण माझ्याकडे आणखी एक कल्पना आहे. मी पालकांना त्यांच्या मुलांना बुद्धिबळाची ओळख करून देण्यास प्रोत्साहित करू इच्छितो आणि ते या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना त्यांना पाठिंबा द्यावा. ही EVs प्रमाणेच आपल्या ग्रहासाठी चांगल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. आणि म्हणूनच, मला वाटते की आपण प्रज्ञाननंदची आई नागलक्ष्मी आणि वडील रमेशबाबू यांना XUV4OO EV भेट द्यायला हवी. आपल्या मुलाची आवड जोपासल्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कृतज्ञतेला ते पात्र आहेत".
Appreciate your sentiment, Krishlay, & many, like you, have been urging me to gift a Thar to @rpragchess
But I have another idea …
I would like to encourage parents to introduce their children to Chess & support them as they pursue this cerebral game (despite the surge in… https://t.co/oYeDeRNhyh pic.twitter.com/IlFIcqJIjm— anand mahindra (@anandmahindra) August 28, 2023
आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि सीईओ राजेश जेजुरीकर यांना या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांना त्यांचे विचार मांडण्या सांगितलं. यावर उत्तर देताना राजेश जेजुरीकर म्हणाले की, "नेत्रदीपक कामगिरीबद्दल प्रज्ञाननंदचे अभिनंदन. श्रीमती नागलक्ष्मी आणि रमेशबाबू यांचा सत्कार करण्याची ही अनोखी कल्पना मांडल्याबद्दल आनंद महिंद्रा यांचे आभार. इलेक्ट्रिक SUV XUV400 च्या विशेष आवृत्ती आणि वितरणासाठी आम्ही संपर्कात राहू".'
Congratulations @rpragchess for your spectacular achievement.Thanks @anandmahindra for the idea of recognising PARENTS of @rpragchess Shrimati Nagalakshmi & Shri Rameshbabu.The All Electric SUV XUV400 would be perfect-our team will connect for a special edition and delivery
आनंद महिंद्रा यांचं ट्वीट व्हायरल झालं आहे. ट्विटला 1 लाख 28 हजारांपेक्षा जास्त व्ह्यू आहेत. यावरही अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 'तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहा. हे अमूल्य आहे,' असं एका युजरने म्हटलं आहे.
अनेकांनी आनंद महिंद्रा यांनी मांडलेल्या वेगळ्या विचारांचं कौतुक केलं आहे. तुमचा विचारशील दृष्टिकोन खरोखरच प्रेरणादायी आहे. अनेकजण प्रज्ञाननंदला थार भेट देण्याचे सुचवत असताना, XUV4OO EV सह पालकांना पाठिंबा देऊन बुद्धिबळाला प्रोत्साहन देण्याची तुमची पर्यायी कल्पना उल्लेखनीय आहे असं एकाने म्हटलं आहे.