भारताच्या आशेवर पाकिस्तानच्या नसीम शहानचं विरजण, अंतिम 2 षटकात असा रंगला थरार!

नसीम शहाने केला भारताच्या स्वप्नांचा चुराडा!

Updated: Sep 8, 2022, 10:59 AM IST
भारताच्या आशेवर पाकिस्तानच्या नसीम शहानचं विरजण, अंतिम 2 षटकात असा रंगला थरार!  title=

Aisa Cup 2022 : आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्धच्या पराभवानंतर भारतीयांच्या नजरा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यावर होत्या. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला धूळ चारली असती तर भारत बाहेर झाला नसता. मंगळवारी पार पडलेल्या अटीतटीच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शहाने अफगाणिस्तानच्या तोंडचा विजयाचा घास हिसकावून घेतला. त्यासोबतच भारताच्या आशेवरही विरजण पडलं.

शेवटच्या 2 षटकांचा थरार- 
पाकिस्तान संघाच्या 18 षटकात 7 विकेट्स गेल्या होत्या, त्यावेळी त्यांना विजयासाठी 23 धावांची गरज होती. पाकिस्तानचा असीफ अली स्ट्राईकवर आणि हसीफ रॉफ नॉन स्ट्राईकला होता. तर अफगाणिस्तानचा फरीद अहमद गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर असीफ अली एक धाव घेतो. दुसऱ्या चेंडूवर हसीफ रॉफ बाद होतो त्यावेळी पाकिस्तान दबावात जातो. आता सामना 10 चेंडू 20 धावांची गरज, असीफ बाद झाल्यानंतर मैदानात नसीम शहा मैदानात आला. 
 
एक चेंडू वाईट जातो त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर नसीमने एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या असीफ अलीने  चौथ्या चेंडूवर एक सिक्स मारत सामना आणखी जवळ आणतो. सामना पूर्ण एका बाजूने झुकला असं वाटत असताना पाचव्या चेंडूवर फरीद अहमद  असीफ अलीला बाद करतो. त्यामुळे सामन्यामध्ये आणखी एक ट्विस्ट येतो. शेवटच्या चेंडूवर नसीम शहा एक धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवतो. 

पाकिस्तानला शेवटच्या 6 चेंडूत 11 धावांची गरज असते तर दुसरीकडे अफगाणिस्तानला 1 विकेट्सची गरज, मात्र पाकिस्तानचा नसीम शहा फारूकीला पहिल्या दोन्ही चेंडूंवर खणखणीत षटकार लगावले आणि नसीम शहाने भारताच्या स्वप्नांचा चुराडा झाला.