Mangal Ast 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहाच्या स्थितीत काही काळानंतर बदल होतात. दरम्यान याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतो. सध्या भूमीपूत्र मंगळ कन्या राशीत बसला आहे. मंगळ 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06.26 वाजता कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशींना फायदा होईल. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना यावेळी काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे.
कन्या राशीमध्ये मंगळाच्या अस्तामुळे अनेक नागरिकांमध्ये काही गोष्टींची कमतरता भासू शकते. कन्या राशीत मंगळ अस्तामुळे कोणत्या राशींना अडचणी येऊ शकतात ते पाहुयात.
मंगळाच्या अस्तामुळे वाढणार या राशींच्या व्यक्तींची डोकेदुखी
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. यासोबतच तो सहाव्या घरात प्रवेश करतोय. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी. नुकसान होण्याची चिन्ह आहेत. मंगळाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना जीवनात मोठ्या समस्या येणार आहेत. करिअर आणि पैसा कमावण्याच्या क्षेत्रात प्रगतीच्या कमी संधी मिळू शकतात.
या राशीत मंगळ पाचव्या भावात अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही चढ-उतार येऊ शकतात. पालकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत या राशीच्या राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक परिस्थिती बिकट राहण्याची शक्यता आहे.
या राशीमध्ये मंगळ पहिल्या घरात अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना किरकोळ आजार कायम राहतील. मंगळाची स्थिती कधीकधी चिंतेचे कारण ठरू शकते. व्यवसायातही थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास काही काळासाठी समस्या उद्भवू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार काही प्रमाणात पुढे ढकणावा लागणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )