मनगटावर लाल-पिवळा धागा बांधण्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल

धार्मिक विधी, पूजा, शुभ कार्य केल्यानंतर अनेक जण हातावर  धागा (मोली) बांधतात. हिंदू धर्मात शुभ कार्यात धागा मनगटावर बांधणे खूप शुभ मानले जाते.

Updated: Jul 25, 2022, 02:30 PM IST
मनगटावर लाल-पिवळा धागा बांधण्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल title=

Hindu Dharmik Dhaga: धार्मिक विधी, पूजा, शुभ कार्य केल्यानंतर अनेक जण हातावर  धागा (मोली) बांधतात. हिंदू धर्मात शुभ कार्यात धागा मनगटावर बांधणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार हातात धागा बांधल्याने जीवनातील संकटे दूर होतात. हा धागा सूती असतो आणि गडद लाल-पिवळा असतो. कालांतराने या धाग्याचा रंग उडून जातो. त्यामुळे धागा खराब दिसत असल्याने लोकं काढून टाकतात. पण तुम्ही जर असं करत असाल तर एकदा नियम जाणून घ्या. कारण शुभ कार्यावेळी बांधलेला धागा फेकणं शुभ मानलं जात नाही. हिंदू धर्मात पवित्र धाग्याचे महत्त्व ज्या पद्धतीने सांगितले आहे. त्याचप्रमाणे ते बांधणे, काढणे किंवा बदलण्याचे नियमही ठरवून दिले आहेत. हे नियम लक्षात घेऊन मनगटावर बांधलेला धागा काढावा.

या नियमांचे पालन करा

शुभ धागा मनगटावर तीन-पाच वेळा गुंडाळूनच बांधावा. मंगळवार आणि शनिवार हे धागा काढण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानले जातात. या दिवशी धागा काढू शकता आणि तुमच्या हातात नवीन धागा बांधू शकता. तुम्ही विषम क्रमांकाच्या दिवशी देखील धागा काढू शकता. फक्त मंगळवार किंवा शनिवार या विषम क्रमांकाच्या दिवसांमध्ये येत नाही ना, याची काळजी घ्याल.

महिलांसाठी धागा बांधण्याचे नियम

स्त्री-पुरुषांमध्ये धागा कोणत्या हातात बांधावेत, याचेही नियम ठरवून दिले आहेत. महिलांनी नेहमी उजव्या हातात धागा बांधावा. त्याचबरोबर विवाहित महिलांनी डाव्या हातात धागा बांधावा.

पुरुषांसाठी धागा बांधण्याचे नियम

पुरुषांनी नेहमी त्यांच्या उजव्या हातात धागा बांधला पाहिजे. धागा बांधताना हातात सरळ ठेवून आणि मूठ बंद करणं अत्यंत आवश्यक आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)