Gajkesari Rajyog : 7 जून रोजी बुध गोचर होणार आहे. यावेळी बुध ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याचवेळी गुरू आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे गजकेसरीसारखा राजयोगही तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये गजकेशरी राजयोग फार शुभ मानला जातो.
बुधाच्या गोचरमुळे गजकेसरी राजयोगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरमुळे निर्माण झालेला हा शुभ योग काही राशींवर चांगला परिणाम होणार असून त्याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया बुध गोचरमुळे तयार होणाऱ्या गजकेसरी योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
बुध गोचरमुळे तयार होणाऱ्या गजकेसरी योगामुळे तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. या काळात तुमची पैशांची बचत करण्यात होऊ शकणार आहे. तुम्हाला परदेशात नोकरी किंवा शिक्षण घ्यायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे. जे काम हाती घेणार आहात ते चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. जास्तीत जास्त लक्ष पैसे कमावण्यावर तुमचा भर असणार आहे.
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचं गोचर फायदेशीर राहणाार आहे. या काळामध्ये वैवाहिक जीवनात चांगले सामंजस्य दिसून येणार आहे. नात्यामध्ये यापूर्वी काही अडचण असेल तर नातं मजबूत होणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोक चांगली कामगिरी करणार आहेत. परदेशात राहणाऱ्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळणार आहे. तुम्हाला या काळात भरपूर पैसा कमावण्याची संधी मिळू शकते. जे काम कठीण वाटतंय, ते सहजतेने पूर्ण होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचं गोचर आर्थिकदृष्ट्या अनुकूल असणार आहे. या काळामध्ये नोकरीमध्ये नवीन आणि चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकणार आहेत. कौटुंबिक वातावरण चांगले राहणार असून जोडीदाराकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे. नशिबाची साथ मिळणार असून रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी तुम्हाला नव्या योजना आखाव्या लागतील. नवा बिझनेस सुरु करायचा विचार असेल तर हा काळ चांगला आहे.
मीन राशीच्या लोकांना बुध गोचर आणि गजकेसरी योग लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला वडिलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळणार आहे. परदेशात जाण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. गुंतवणूकीच्या ठिकाणी चांगला नफा मिळविण्याच्या संधी मिळू शकणार आहे. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठीही हे गोचर फलदायी असणार आहे. या काळात उत्साहाने सर्व कामे सहज पूर्ण कराल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )