Friday Panchang : आज षौष पुत्रदा एकादशीला शुभ योग! 'या' मुहूर्तावर करा भगवान विष्णूची आराधना

10 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील एकादशी तिथी असून भगवान विष्णूची आराधना करण्यात येणार आहे. पुत्रदा एकादशीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jan 10, 2025, 12:30 AM IST
Friday Panchang : आज षौष पुत्रदा एकादशीला शुभ योग! 'या' मुहूर्तावर करा भगवान विष्णूची आराधना title=
पौष पुत्रदा एकादशी

Panchang 10 January 2025 in Marathi : मराठी पंचांगानुसार आज नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे. या एकादशीला पौष पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं. पुत्रदा एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्व कामांतून निवृत्त होऊन स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताची शपथ घ्या. यानंतर भगवान विष्णूची विधिवत पूजा सुरू करा. एकादशीचे व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. पुत्रदा एकादशीचे व्रत 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 ते 8.21 या वेळेत सोडलं जाणार आहे. (Friday Panchang )  

पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून आज गजकेसरी योग,  शुभ योगासह शुक्ल योग आणि कृतिका नंतर रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र वृषभ राशीत असणार आहे. 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Friday panchang 10 january 2025 panchang in marathi Pausha Putrada Ekadashi 2025) 

पंचांग खास मराठीत! (10 January 2025 panchang marathi)

वार - शुक्रवार
तिथी - एकादशी - 10:22:17 पर्यंत
नक्षत्र - कृत्तिका - 13:46:36 पर्यंत
करण - विष्टि - 10:22:17 पर्यंत, भाव - 21:22:19 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुभ - 14:36:35 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 07:15:18
सूर्यास्त - 17:41:58
चंद्र रास - वृषभ
चंद्रोदय - 14:07:00
चंद्रास्त - 28:45:59
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:26:39
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - पौष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 09:20:38 पासुन 10:02:25 पर्यंत, 12:49:31 पासुन 13:31:18 पर्यंत
कुलिक – 09:20:38 पासुन 10:02:25 पर्यंत
कंटक – 13:31:18 पासुन 14:13:05 पर्यंत
राहु काळ – 11:10:18 पासुन 12:28:38 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 14:54:51 पासुन 15:36:38 पर्यंत
यमघण्ट – 16:18:24 पासुन 17:00:11 पर्यंत
यमगण्ड - 15:05:18 पासुन 16:23:38 पर्यंत
गुलिक काळ – 08:33:38 पासुन 09:51:58 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:07:45 पासुन 12:49:31 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)