नवीन वर्षाचा पहिला शनिवार 5 राशींसाठी लकी, शनिदेवाचा विशेष राहिल आशीर्वाद

शनिवार, 4 जानेवारीला शतभिषा नक्षत्रासोबत सिद्धी योग जुळून येत आहे. या शुभ योगायोगात शनिदेवाच्या आशीर्वादाने मिथुन आणि सिंह राशीसह 5 राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड आर्थिक यश मिळेल.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 3, 2025, 07:37 PM IST
नवीन वर्षाचा पहिला शनिवार 5 राशींसाठी लकी, शनिदेवाचा विशेष राहिल आशीर्वाद title=

Horoscope Today : शनिवार, 4 जानेवारी रोजी सिद्धी योगात शनिदेवाच्या आशीर्वादाने मिथुन आणि सिंह राशीसह 5 राशीच्या लोकांना व्यवसायात मोठे यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुमच्या प्रगतीची शक्यता आहे आणि तुम्हाला व्यवसायात उत्कृष्ट नफा मिळेल. तुमची बँक बॅलन्स वाढेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. शनिवारचे आर्थिक राशीभविष्य सविस्तर पहा.

मेष 
मेष राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतात. या बदलांमुळे तुमचे सहकारी थोडे नाराज होऊ शकतात. तुम्हाला इतरांना मदत करायला आवडते. तुमचा दिवस परोपकारात जाईल.

वृषभ 
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस कुटुंबासोबत आनंदाने भरलेला असेल. दुपारपर्यंत काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. संध्याकाळी एक विशेष पाहुणे येऊ शकतात.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना आज काही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळू शकते. वडिलांचे आशीर्वाद आणि उच्च अधिकाऱ्यांचे आशीर्वाद उपयोगी पडतील. दिवसभर व्यस्त राहाल. फालतू खर्च टाळा.

कर्क 
कर्क राशीच्या लोकांना आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. घाईघाईने आणि भावनिक होऊन कोणताही निर्णय घेणे टाळा.

सिंह 
सिंह राशीच्या लोकांना राजकारणात मोठे यश मिळू शकते. मुलांप्रती असलेली जबाबदारी पार पाडाल. स्पर्धेत पुढे जाईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसह तुमच्या योजना यशस्वी होतील. 

कन्या 
कन्या राशीच्या लोकांना आज मेहनतीचा फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सर्जनशील कार्यात रुची राहील. प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्या सुटतील. सरकारकडूनही मदत मिळू शकते.

तूळ 
तूळ राशीच्या लोकांना आज शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या वक्तृत्वामुळे तुम्हाला आदर मिळेल. धावपळ केल्यामुळे, हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या.

वृश्चिक 
वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि तुमची संपत्ती, सन्मान, कीर्ती आणि वैभव वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रियजनांची भेट होईल. वाणीवर नियंत्रण न ठेवल्याने अडचणी येऊ शकतात. संध्याकाळी प्रियजनांना भेटण्याची आणि रात्री मनोरंजनाची संधी मिळेल.

धनु
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस खर्चिक असेल. घरातील सामानांवर होईल खर्च. सुख सुविधाने समृद्ध असेल घर. कर्मचाऱ्यामुळे नात्यामधील दुरावा वाढू शकतो. पैशाचे व्यवाहर करताना सावध राहा. 

मकर 
मकर राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यवसायात बदलाचे नियोजन होऊ शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. संध्याकाळी धार्मिक स्थळी जाण्याचे बेत आखले जातील.

कुंभ 
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस लाभ आणि प्रगतीने भरलेला असेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. तुमच्यासाठी कुठूनतरी चांगली बातमी येऊ शकते. त्यामुळे धावपळ आणि खर्च वाढू शकतो. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करताना, त्याच्या सर्व कायदेशीर बाबींवर लक्ष द्या.

मीन 
मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखकर राहील. आज छोटा किंवा लांबचा प्रवास होऊ शकतो. व्यवसायात प्रगतीमुळे आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून आराम मिळेल. संध्याकाळी बाहेर पडताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)