Budh Rashi Parivartan 2022: नवग्रहांमध्ये बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, व्यवसाय, संपत्तीचा कारक ग्रह आहे. बुध ग्रह आज म्हणजेच 21 ऑगस्ट 2022 रोजी कन्या राशीत प्रवेश करत आहे. बुध ग्रह या राशीत 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील. बुध ग्रहाच्या या गोचरामुळे काही राशींना शुभ परिणाम जाणवतील. चला तर मग जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत.
वृषभ- कन्या राशीत बुधाचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. नोकरीत अपेक्षित यश मिळेल. ज्यांना करिअरमध्ये बदलाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच आर्थिक लाभ होईल आणि उत्पन्न वाढेल. व्यवसायातील गुंतवणुकीतून फायदा होईल. मित्रपक्ष तुम्हाला साथ देतील. वडिलोपार्जित व्यवसायात लाभ होईल.
मिथुन- बुध राशीचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना लाभदायी ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. घर खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील.
सिंह- सिंह राशीत बुध बदलामुळे नोकरीत प्रगती होऊ शकते. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यासाठी हा उत्तम काळ आहे. सरकारी नोकऱ्या मिळवू इच्छिणाऱ्या लोकांनी जोरदार तयारी करावी. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
कन्या- राशी बदलून बुध तुमच्याच राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे बुध गोचराचा प्रभाव अधिक राहील. या लोकांच्या व्यावसायिक जीवनासाठी पुढील 2 महिने शुभ राहतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. व्यवसायात लाभ होईल. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)