Mahashivratri 2024 Lucky Zodiac Sign : हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप मोठा महत्त्व आहे. भगवान शिवाला समर्पित या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, असं मानलं जातं. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो. यावर्षी महाशिवरात्री शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग तयार होताना दिसतोय.हा योग सुमारे 300 वर्षांनंतर तयार होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे 4.45 वाजल्यापासून शिवयोग दिवसभर चालणार आहे. यासोबतच सकाळी ६.४५ पासून सर्वार्थ सिद्धी योग सुरू होणार असून तो सकाळी १०.४१ पर्यंत चालणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राचा संयोग आहे, ज्यामुळे चंद्र मंगल योग तयार होणार आहे. यासोबतच कुंभ राशीत शुक्र, शनि आणि सूर्य यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होतोय. राहू आणि बुध यांचा संयोग मीन राशीत होणार आहे. असा योगायोग अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणू शकतो.
मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक लाभासोबतच त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. करिअर क्षेत्रात चालू असलेल्या सर्व समस्या संपून प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात ज्यातून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. गुंतवणुकीत नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.
या राशीच्या लोकांवरही भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद असू शकतो. बिझनेसमध्ये नवीन करार होऊ शकतात. तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. नात्यातही तुम्हाला बरेच फायदे दिसून येणार आहेत. प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.
सिंह राशीच्या लोकांनाही खूप फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असू शकते. वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेतूनही लाभ मिळण्याच्या संधी आहेत. नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. लव्ह लाईफ खूप चांगली जाणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )