1/20
![तिला प्रत्यक्षात पाहिलेले लोक म्हणे म्हणायचे की, ती पडद्यापेक्षा कैकपटीने प्रत्यक्षात दिसायला सुंदर होती. एकदा एका एफएम चॅनलवर मधुबालाच्या एका बहिणीने एक किस्सा सांगितला होता. मधुबालाच्या शेवटच्या दिवसांत त्या दोघी टॅक्सीने कुठेतरी चालल्या होत्या. त्या टॅक्सीत बसताच काही वेळाने ड्रायव्हरने रेअर व्ह्यू मिररमध्ये बघत तिला ती मधुबाला आहे का? असं विचारलं. टॅक्सीवाला जिवंत असेतो ही भेट त्याच्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा बनून राहिली असेल!, मुहब्बत हमने माना ज़िंदगी बरबाद करती है,
ये क्या कम है की मर जानेमें दुनिया याद करती है|](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153422-madhubala20.jpg)
तिला प्रत्यक्षात पाहिलेले लोक म्हणे म्हणायचे की, ती पडद्यापेक्षा कैकपटीने प्रत्यक्षात दिसायला सुंदर होती. एकदा एका एफएम चॅनलवर मधुबालाच्या एका बहिणीने एक किस्सा सांगितला होता. मधुबालाच्या शेवटच्या दिवसांत त्या दोघी टॅक्सीने कुठेतरी चालल्या होत्या. त्या टॅक्सीत बसताच काही वेळाने ड्रायव्हरने रेअर व्ह्यू मिररमध्ये बघत तिला ती मधुबाला आहे का? असं विचारलं. टॅक्सीवाला जिवंत असेतो ही भेट त्याच्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा बनून राहिली असेल!, मुहब्बत हमने माना ज़िंदगी बरबाद करती है,
ये क्या कम है की मर जानेमें दुनिया याद करती है|
2/20
![दरवेळी हे गाणं पाहताना मला हा प्रश्न किशोरकुमारसाठी नसून मधुबालाच्या दर्शनाने दिपलेल्या प्रेक्षकांसाठी आहे असंच वाटतं. आम्हां प्रेक्षकांचं काय हो? तमाम उम्र तेरा इंतज़ार कर लेंगे, मगर ये रंज रहेगा के ज़िंदगी कम है|](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153421-madhubala19.jpg)
3/20
!['चलती का नाम गाडी'तलं सर्वांत आवडतं गाणं कोणतं, असं विचारलं तर शंभरातले नव्व्याण्णव लोक 'एक लड़की भीगी भागीसी' हेच सांगतील. मीही अपवाद कसा असणार? पण या गाण्यासोबतच माझं अतिशय लाडकं गाणं म्हणजे 'हाल कैसा है जनाब](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153420-madhubala17.jpg)
4/20
![मधुबालाची आणि माझी पहिली ओळख 'चलती का नाम गाडी'ची. किशोरदांची जबरदस्त फॅन असल्यानं त्यांच्या 'मनू'साठी आणि चित्रपटातल्या गाण्यांसाठी हा चित्रपट मी सर्वप्रथम पाहिला खरा, पण नंतर अनेक वेळा पाहिला तो त्याचं 'पाँच रुपय्या बारा आना'चं बिल थकवणार्या त्याच्या प्रेयसीसाठीसुद्धा.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153419-madhubala16.jpg)
5/20
![एका तरी माणसाला हसणार्या मधुबालेला बघून फ़राज़च्या ओळी आठवल्या असतील का नाही कोणास ठाऊक, पण मला तरी फ़राज़नं त्या जणू तिच्यासाठीच लिहिल्यासारख्या वाटतातः सुना है ज़िंदगी इम्तहाँ लेती है फ़राज़, पर यहाँ तो इम्तहानों ने ज़िंदगी ले ली|](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153417-madhubala15.jpg)
6/20
![मधुबालाची म्हणे एक खासियत होती. तिच्या मनावर फार ताण आला की ती छोट्याछोट्या कारणांनी हसत सुटायची. मग तिचं हे हसू थांबता थांबत नसे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153416-madhubala14.jpg)
7/20
![तोही बिचारा दिलके हाथों मजबूर! म्हणून तर हे गाणं आपल्यासाठी नसून शेजारच्या टेबलाजवळ बसून स्मितहास्य करणार्या अशोककुमारसाठी आहे हे लक्षात आलं तरी तो फक्त एक भुवई उडवतो. एवढ्या सुंदर स्त्रीवर का रागवता येतं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153415-madhubala13.jpg)
8/20
![तोही बिचारा दिलके हाथों मजबूर! म्हणून तर हे गाणं आपल्यासाठी नसून शेजारच्या टेबलाजवळ बसून स्मितहास्य करणार्या अशोककुमारसाठी आहे हे लक्षात आलं तरी तो फक्त एक भुवई उडवतो. एवढ्या सुंदर स्त्रीवर का रागवता येतं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153414-madhubala12.jpg)
9/20
![हीरो तर सोडाच पण चित्रपटातल्या व्हिलन्सनाही तिचा मोह न पडला तरच नवल. म्हणूनच 'हावड़ा ब्रिज'मध्ये 'आईये मेहरबाँ, बैठिये जानेजाँ' म्हणत तिनं के. एन. सिंगचा पुरता मामा करून टाकला.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153412-madhubalaeleven.jpg)
10/20
![तिच्या जीवनाची हीच कहाणी असली, तरी ती काम करत राहिली. आपल्या रूपाची, अभिनयाची मोहिनी रसिकांवर घालत राहिली.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153410-madhubalaten.jpg)
11/20
![गाणं ओळखलं असेलच तुम्ही-अच्छा जी मैं हारी. नानाविध प्रकारे देवाची समजूत काढू पाहणार्या मधुबालाला पाहून 'नशीबवान आहे लेकाचा...' अशीच भावना ही गाणं पहाणार्या प्रत्येक तरुणाची तेव्हा झाली असेल, आजही होते आणि पुढेही होतच राहील. ग़मोंने बाँट लिया है मुझको आपसमें, के जैसे मैं कोई लूटा हुआ ख़जाना था](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153409-madhubalanine.jpg)
12/20
!['काला पानी'मधला देव आनंद, रुसलेला प्रियकर तसेच आणि त्याची मनधरणी करणारी त्याची प्रियतमा आहे मधुबाला.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153408-madhubalaeight.jpg)
13/20
![ही अस्मानीची परीसुद्धा अकाली आपल्यातून निघून गेली आणि मागे तिचे चाहते फ़राज़च्या ओळी म्हणत - उस शक़्सको तो बिछडनेका सलिक़ा भी नहीं फ़राज़, जाते हुए ख़ुद को मेरे पास छोड़ गया|](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153407-madhubalasevan.jpg)
14/20
!['फागुन' चित्रपटात हा चितचोर साकारला होता भारत भूषणनं. मागे राहिलेल्या प्रेमिकेची व्यथा मांडणारं सुरेख गाणं होतं- 'इक परदेसी मेरा दिल ले गया'.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153406-madhubalasix.jpg)
15/20
!['हुस्न के लाखो रंग' म्हणतात ते काही खोटं नाही.. पावसाळी रुमानी हवेत 'शामसे उनके तसव्वूरका नशा था इतना, नींद आयी है तो आँखोंने बुरा माना है' अशी हालत करून टाकणारं तिचं 'मिस्टर अँड मिसेस ५५'मधलं गाणं होतं - 'थंडी हवा काली घटा'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153405-madhubalafive.jpg)
16/20
![एक रहस्यपट म्हणूनही 'महल' हा हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाच्या वेळी मधुबाला उणीपुरी सोळा वर्षांची होती. आजही टीव्हीवर 'आयेगा आनेवाला' लागलं, की लोक मी खिळून राहतात. 'ना जाने दिलकी कश्ती कब तक लगे किनारे' या ओळींनी तिच्या येणार्या आयुष्याची कथाच सांगितली होती का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153404-madhubalafour.jpg)
17/20
![मधुबालाची चित्रपट कारकीर्द तिच्या वयाच्या नवव्या वर्षी सुरू झाली, पण तिला खर्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती १९४९ साली आलेल्या 'महल' या चित्रपटानं. या चित्रपटामुळे मधुबाला आणि लता मंगेशकर या दोघींनी सुरैय्याच्या अभिनेत्री आणि गायिका या दोन्ही स्थानांना मोठा धक्का दिला.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153403-madhubalathree.jpg)
18/20
![रस्त्याच्या कडेला हिंदी चित्रपटतार्यांची पोस्टर्स विकणार्याकडचं तिचं पोस्टर आजही हृदयाचा ठोका चुकवतं, मुमताज़ म्हणून जन्माला आलेली ती लाखो-करोडो मनांत कायमचं घर करून राहिली, ती देविकाराणींनी तिला दिलेल्या 'मधुबाला' या नावाने.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153402-madhubalatwo.jpg)
19/20
![ऐ चाँद, तू इस तरह इतराकर ना देख,
हमने भी कई चाँद देखें हैं|
तुम में तो दाग़ है,
हमने तो बेदाग़ देखें हैं|](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153401-madhubalaone.jpg)
20/20
![मधुबाला, लाखो-करोडो रसिकांच्या हृदयाची धडकन, स्वर्गातून उतरलेली खूबसूरत परी आणि एक अप्रतिम अदाकारा, तिचं खट्याळ हास्य वर्षांनुवर्षांच्या सीमा पार करून आजही मनावर गारूड करतं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/09/17/153400-madhubala13-copy.jpg)