सध्याचे ‘अँन्टी-हिरो’...

Nov 07, 2013, 14:10 PM IST
1/6

गुलशन देवैहइतर अभिनेत्यांच्या मानाने हे नाव थोडं अनोळखी वाटतंय ना! हरकत नाही, पण आगामी ‘रामलीला’ सिनेमात रणवीर सिंगसोबत ढुशूम ढुशूम करताना तुम्ही याला पाहिलंत की हेही नाव तुम्हाला ओळखीचं होऊन जाईल. बॉलिवूडमध्ये त्यानं यापूर्वीही काही सिनेमे केले असले तर ‘रामलीला’ त्याच्या हीट ठरेल, अशी आशा आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्याचा ‘शैतान’ पाहा... मग, तुम्हालाही हे नक्कीच पटेल की खराखुरा ‘राक्षस’ याच्याचप्रमाणे असू शकतो.   पाहा सिनेमाचा ट्रेलर

गुलशन देवैह

इतर अभिनेत्यांच्या मानाने हे नाव थोडं अनोळखी वाटतंय ना! हरकत नाही, पण आगामी ‘रामलीला’ सिनेमात रणवीर सिंगसोबत ढुशूम ढुशूम करताना तुम्ही याला पाहिलंत की हेही नाव तुम्हाला ओळखीचं होऊन जाईल.

बॉलिवूडमध्ये त्यानं यापूर्वीही काही सिनेमे केले असले तर ‘रामलीला’ त्याच्या हीट ठरेल, अशी आशा आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्याचा ‘शैतान’ पाहा... मग, तुम्हालाही हे नक्कीच पटेल की खराखुरा ‘राक्षस’ याच्याचप्रमाणे असू शकतो.

पाहा सिनेमाचा ट्रेलर



2/6

रोनित रॉय – बॉसमोठ्या पडद्याकडून छोट्या पडद्याकडे वळलेला आणि पुन्हा धडाक्यात मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारा रोनित रॉय सध्या नकारात्म भूमिकांमध्येही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.‘खाकी’ आणि ‘उडान’ या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसलेल्या रोनितनं ‘बॉस’मध्ये पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकाच स्वीकारली. अक्षय कुमारच्या या मसालेदार सिनेमात रोनित मात्र एका ‘सिरियस लूक’मध्ये दिसला.  पाहा सिनेमाचा ट्रेलर

रोनित रॉय – बॉस

मोठ्या पडद्याकडून छोट्या पडद्याकडे वळलेला आणि पुन्हा धडाक्यात मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारा रोनित रॉय सध्या नकारात्म भूमिकांमध्येही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.

‘खाकी’ आणि ‘उडान’ या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसलेल्या रोनितनं ‘बॉस’मध्ये पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकाच स्वीकारली. अक्षय कुमारच्या या मसालेदार सिनेमात रोनित मात्र एका ‘सिरियस लूक’मध्ये दिसला.


पाहा सिनेमाचा ट्रेलर

3/6

विवेक ऑबेरॉय – क्रिश ३बऱ्याच कालावधीपासून एकही हिट न देणारा विवेक ऑबेरॉय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘क्रिश ३’ या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारतोय. बॉलिवूडनं आजवर अनेक सुपरहिरो पाहिलेत पण, विवेक हा सध्याचा सगळ्यात आकर्षक व्हिलन ठरतोय. विवेक ‘क्रिश ३’मध्ये ‘काल’च्या भूमिकेत दिसलाय. त्याला पाहिल्यानंतर तो आपल्याला लवकरच आणखी सिनेमांत पाहायला मिळेल, हे मात्र नक्की...   पाहा सिनेमाचा ट्रेलर

विवेक ऑबेरॉय – क्रिश ३

बऱ्याच कालावधीपासून एकही हिट न देणारा विवेक ऑबेरॉय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘क्रिश ३’ या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारतोय. बॉलिवूडनं आजवर अनेक सुपरहिरो पाहिलेत पण, विवेक हा सध्याचा सगळ्यात आकर्षक व्हिलन ठरतोय.

विवेक ‘क्रिश ३’मध्ये ‘काल’च्या भूमिकेत दिसलाय. त्याला पाहिल्यानंतर तो आपल्याला लवकरच आणखी सिनेमांत पाहायला मिळेल, हे मात्र नक्की...

पाहा सिनेमाचा ट्रेलर

4/6

आमिर खान – धूम ३सध्या आमिरच्या ‘धूम ३’नं प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडवून दिलीय. सुपरबाईकवर सवार होईन पोलिसांना चकमा देणारा हा अँन्टी हिरो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. हा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘परफेक्शनिस्ट’च्या या सिनेमांची उत्सुकता आत्तापासूनच दिसतेय.   पाहा सिनेमाचा ट्रेलर

आमिर खान – धूम ३

सध्या आमिरच्या ‘धूम ३’नं प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडवून दिलीय. सुपरबाईकवर सवार होईन पोलिसांना चकमा देणारा हा अँन्टी हिरो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. हा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘परफेक्शनिस्ट’च्या या सिनेमांची उत्सुकता आत्तापासूनच दिसतेय.

पाहा सिनेमाचा ट्रेलर

5/6

करण जोहर – बॉम्बे वेलवेट‘बॉम्बे वेलवेट’ हा चित्रपट अनेकांना अनेक अर्थाने काही तरी देऊन जाणार हे नक्की... कारण, या सिनेमाच्या निमित्ताने अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडून येत आहेत. या सिनेमाची मजेशीर गोष्ट म्हणजे करण जोहर या सिनेमात एका ‘व्हिलन’च्या भूमिकेत दिसतोय. आणि ही भूमिका काही मिनिटांसाठी नाही तर संपूर्ण सिनेमाभर तो आपल्याला नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे रणबीर कपूर... या सिनेमाच्या काही भागाचं श्रीलंकेत शूट पार पडलंय. पुढच्या वर्षी गांधी जयंतीच्या निमित्तानं हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील येईल... करण ‘व्हिलन’च्या भूमिकेत कसा दिसेल? याचे आडाखे प्रेक्षक आत्तापासूनच बांधत आहेत.

करण जोहर – बॉम्बे वेलवेट

‘बॉम्बे वेलवेट’ हा चित्रपट अनेकांना अनेक अर्थाने काही तरी देऊन जाणार हे नक्की... कारण, या सिनेमाच्या निमित्ताने अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडून येत आहेत.

या सिनेमाची मजेशीर गोष्ट म्हणजे करण जोहर या सिनेमात एका ‘व्हिलन’च्या भूमिकेत दिसतोय. आणि ही भूमिका काही मिनिटांसाठी नाही तर संपूर्ण सिनेमाभर तो आपल्याला नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे रणबीर कपूर... या सिनेमाच्या काही भागाचं श्रीलंकेत शूट पार पडलंय. पुढच्या वर्षी गांधी जयंतीच्या निमित्तानं हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील येईल... करण ‘व्हिलन’च्या भूमिकेत कसा दिसेल? याचे आडाखे प्रेक्षक आत्तापासूनच बांधत आहेत.

6/6

सध्याचे टॉप ५ ‘अँन्टी-हिरो’...आत्ताचे बॉलिवूड खलनायकही स्टायलिश, स्मार्ट, पिळदार शरीराचे आणि मुख्यत: लोकांच्या टाळ्या मिळवताना दिसत आहेत. सिनेमात समाज विघातक गोष्टी करूनसुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यात ते यशस्वी होतात. अगोदर त्यांना ‘व्हिलन’... मग, गुंड्याच्या रुपात आणि आता आपण याच खलनायकांना ‘अँन्टी हिरो’च्या रुपात पाहतोय... चला, तर पाहुयात सध्याचे टॉप ५ अँन्टी हिरो...

सध्याचे टॉप ५ ‘अँन्टी-हिरो’...

आत्ताचे बॉलिवूड खलनायकही स्टायलिश, स्मार्ट, पिळदार शरीराचे आणि मुख्यत: लोकांच्या टाळ्या मिळवताना दिसत आहेत. सिनेमात समाज विघातक गोष्टी करूनसुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यात ते यशस्वी होतात.

अगोदर त्यांना ‘व्हिलन’... मग, गुंड्याच्या रुपात आणि आता आपण याच खलनायकांना ‘अँन्टी हिरो’च्या रुपात पाहतोय... चला, तर पाहुयात सध्याचे टॉप ५ अँन्टी हिरो...