चित्रपटातील 'या' अभिनेत्रीने 2 कोटींमध्ये विकत घेतलेला एक विवाहीत पती

माणसाची लोभी वृत्ती हा माणसाला काहीही करायला भाग पाडते. माणसाच्या या वृत्तीमुळे कधीकधी त्याचे आयुष्य ही पणाला लागू शकते. याबाबतीत आपण बऱ्याचदा ऐकतो आणि अशा घटना पाहतो सुद्धा. माणसाच्या या लोभी वृत्तीला केंद्रित करणारी अशीच गोष्ट मोठ्या पडद्यावर सुद्धा आली होती. या चित्रपटातील लोभी पत्नीची भूमिका तर सर्वांनाच थक्क करणारी आहे. आज आम्ही 28 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटातील गाण्यांपासून ते त्यातील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 

Feb 04, 2025, 12:37 PM IST

Hit Film of 90s Era: माणसाची लोभी वृत्ती हा माणसाला काहीही करायला भाग पाडते. माणसाच्या या वृत्तीमुळे कधीकधी त्याचे आयुष्य ही पणाला लागू शकते. याबाबतीत आपण बऱ्याचदा ऐकतो आणि अशा घटना पाहतो सुद्धा. माणसाच्या या लोभी वृत्तीला केंद्रित करणारी अशीच गोष्ट मोठ्या पडद्यावर सुद्धा आली होती. या चित्रपटातील लोभी पत्नीची भूमिका तर सर्वांनाच थक्क करणारी आहे. आज आम्ही 28 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटातील गाण्यांपासून ते त्यातील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 

 

1/7

90 च्या दशकातील हीट चित्रपट

या काळात सुद्धा बरेचजण हे 90 च्या दशकातील चित्रपट पाहणं पसंत करतात. अशा प्रेक्षकांना 90 च्या दशकातील हा हीट चित्रपट अगदी आवडीने पाहतील. या चित्रपटाची कथा तसेच कालाकारांनी साकारलेल्या भूमिका या कौतुकास्पद आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिले. यावेळी सिनेमागृहात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. हा एक लो बजेट चित्रपट असूनसुद्धा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने गडगंज कमाई केली.   

2/7

उर्मिला मातोंडकरची मुख्य भूमिका

या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज 51 वा वाढदिवस आहे. तिने दिलेल्या या हीट चित्रपटाविषयी सविस्तर जाणून घेऊयात.  

3/7

चित्रपट 'जुदाई'

90 च्या दशकातील हा हीट चित्रपट आहे, 'जुदाई'. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर तसेच अभिनेत्री श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत झळकल्या. 'जुदाई' रोमँटीक कॉमेडी चित्रपटात श्रीदेवीने काजल नावाच्या एका लोभी पत्नीची भूमिका साकारली आहे.   

4/7

2 कोटींसाठी पतीला दिला घटस्फोट

या चित्रपटात फरीदा जलाल, जॉनी लीव्हर, कादर खान, परेश रावल आणि उपासना सिंह यांचे सुद्धा काम पाहायला मिळाले. चित्रपटात बरेच ट्विस्टही आहेत. पहिला ट्विस्ट येतो जेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (चित्रपटातील जान्हवी) एन्ट्री करते. उर्मिलाला अनिल कपूर म्हणजेच काजलचा नवरा (राज) आवडू लागतो. उर्मिलाला कोणत्याही परिस्थितीत राजसोबत लग्न करायचे होते. यानंतर काजलने पैशांच्या हव्यासापोटी तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिल्याची कथा चित्रपटात पाहायला मिळते.   

5/7

इथे पाहता येईल चित्रपट

चित्रपटातील कथेमध्ये राजचा सगळ्याला विरोध असूनसुद्धा त्याला काजलच्या मनाप्रमाणे वागावे लागले. मात्र, काजलला काही काळानंतर या सगळ्याचा पश्चात्ताप होतो. अशी हा रोमांचक कथा असलेला चित्रपट तुम्हाला झी-5 वर पाहता येईल.   

6/7

बॉक्स ऑफिसवर 28.77 कोटींचं कलेक्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कंवर यांनी दिग्दर्शित केलेला 'जुदाई' हा चित्रपट जवळपास 6.3 कोटी रुपयांमध्ये बनवला गेला होता आणि या चित्रपटाने जवळपास 28.77 कोटी रुपयांची कमाई केली होती. या कलेक्शनमुळे निर्मात्यांनाही चांगलाच धक्का बसला होता.   

7/7

उर्मिला मातोंडकरचा 51 वा वाढदिवस

उर्मिला मातोंडकर आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिलाने सिनेसृष्टीत 'रंगीला' चित्रपटातून आपली खरी ओळख निर्माण केलीया चित्रपटातून तिला ‘रंगीला गर्ल’ हा टॅग मिळाला. आजही चाहते तिला याच नावाने ओळखतात. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. उर्मिलाने 2016 मध्ये व्यावसायिक मोहसिन अख्तर मीर यांच्याशी लग्न केले आणि चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यानंतर 2019 मध्ये उर्मिलाने राजकारणात प्रवेश केला.