एक सोपी ट्रीक... 'ही' सुविधा Activate करून बँकेतील Saving अकाऊंटवर मिळवा तिप्पट व्याज

Bank Service Updates : बँकेत गेलात तर, ही सुविधा Activate करणायला अजिबात विसरु नका; थोडासा वेळ खर्च करुन मिळवा घसघशीत फायदा...   

Sayali Patil | Feb 04, 2025, 13:39 PM IST

Bank Service Updates : बँकेत गेल्यानंतर अनेकदा काही गोष्टी किंवा काही नियम दुर्लक्षित राहतात आणि खातेदार म्हणून आपण त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांना मुकतो. 

1/7

मेहनतीची कमाई

Bank auto sweep account that allows to earn three times interest rate

Bank Service Updates : अनेकदा मेहनतीच्या कमाईनं मिळवलेले पैसे खर्च करण्यासाठी Saving अकाऊंटसमवेत एफडी किंवा आरडी अशा पर्यायांना पसंती दिली जाते. पण, सेविंग अकाऊंटवर (Saving Account) किंवा करंट अकाऊंटवर (Current Account) वर एफडी आणि आरडी (FD, RD Account) च्या तुलनेत कमी व्याज मिळतं ही वस्तूस्थिती.   

2/7

बँक

Bank auto sweep account that allows to earn three times interest rate

तुम्हाला कल्पनाही नसेल, पण बँकांकडे यावरही तोडगा आहे. जितं खातेदार म्हणून तुम्ही एक सुविधा सुरू करत अर्थात अॅक्टिवेट करत आर्थिक स्वरुपात फायदा मिळवू शकता. ही सुविधा आहे ऑटो स्वीप सर्विस (Auto Sweep Service). ही एक अशी सुविधा आहे ज्याची अनेकांनाच कल्पनाही नसते. पण, त्यातून तिपटीनं व्याज मिळवता येतं. 

3/7

ट्रान्सफर

Bank auto sweep account that allows to earn three times interest rate

खातेधारकांना ऑटो स्वीप सर्विसअंतर्हत सरप्लस फंडवर अधिक व्याज मिळवणं शक्य होतं. याअंतर्गत तुम्ही Saving Account मध्ये असणाऱ्या रकमेहून अधिक रक्कम जमा झाल्यास सरप्लस फंडच्या स्थितीमध्ये Automatically ही रक्कम FD मध्ये ट्रान्सफर केली जाते. त्यामुळं तुम्हाला सेविंगऐवजी एफडीवर मिळणारं व्याज लागू होतं. 

4/7

रक्कम

Bank auto sweep account that allows to earn three times interest rate

उदाहरणार्थ, तुम्ही खात्याची मर्यादा 20000 रुपये निर्धारित केली आहे आणि खात्यात 60000 रुपये भरण्यात आले आहे. तर, 20 हजार रुपयांहून अधिकची रक्कम म्हणजेच जास्तीचे 40 हजार रुपये एफडीमध्ये रुपांतरित होऊन त्या बँकेत लागू असणारे एफडीचे व्याजदर या वाढीव रकमेवरही लागू होतील. पण, मूळ 20 हजारांच्या रकमेवर मात्र सेविंग अकाऊंटचेच व्याजदर लागू राहतील. 

5/7

खातं

Bank auto sweep account that allows to earn three times interest rate

बँकेत जाऊन काही वेळ दवडून तुम्ही ही सुविधा सुरु केल्यास सर्वात मोठा फायदा मिळतो तो म्हणजे खात्यातील जमा रकमेवर अधिकाधिक फायदा मिळाल्यामुळं खातेधारक अधिक Saving साठी प्रेरित होतात. 

6/7

ऑटो स्वीप

Bank auto sweep account that allows to earn three times interest rate

Auto Sweep Service मध्ये तुम्हाला मॅन्युअली रक्कम एफडीमध्ये ट्रान्सफर करावी लागत नसून, ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित तंत्रानं सुरु राहते आणि यावर वाढीव व्याजदराचा फायदासुद्धा घेता येतो. 

7/7

हुशारी दाखवा

Bank auto sweep account that allows to earn three times interest rate

व्याजदराचं म्हणावं तर, सहसा बँका सेविंग अकाऊंटवर सरासरी 2.5 टक्के इतका व्याज देतात. हे दर बँकांच्या धोरणांप्रमाणं बदलतात. तर, FD वर बँकांकडून 6.5 ते 7 टक्के इतकं व्याज दिलं जातं. हे गणितही प्रत्येक बँकेनुसार बदलतं. ज्यामुळं या दोन्ही सुविधा मिळवत एकाच खात्यावर तिप्पट व्याजाचा फायदा घेता येतो. तेव्हा हुशारी दाखवा आणि बँकेतील व्यवहारांसंदर्भातील निर्णय व्यवस्थित हिशोब करूनच घ्या.