धोनीचा मित्र पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरची नोकरी, खेळलाय 2011 ची वर्ल्ड कप फायनल

Cricket News : क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ खेळणारे क्रिकेटर्स मॅच फी, लीग कॉन्ट्रॅक्ट आणि जाहिरातींमधून एवढी कमाई करतात ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. अनेकजण तर कोट्यवधीश देखील होतात. पण अशा एका क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत जो सध्या पोटासाठी बस ड्रायव्हरची नोकरी करतोय.

Pooja Pawar | Feb 07, 2025, 16:42 PM IST
1/7

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी विरुद्ध 2011 वर्ल्ड कप फायनल आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळलेला श्रीलंकेचा क्रिकेटर सूरज रणदीव याच्यावर सध्या बस चालवण्याची वेळ आली आहे. माजी क्रिकेटर असलेला सूरज रणदीव हा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहून हे काम करतोय.   

2/7

श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सूरज रणदीव हा आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्समध्ये खेळलेला असून त्याने 2012 मध्ये सीएसकेसाठी 8 सामन्यात  6 विकेट्स घेतल्या होत्या.   

3/7

 सूरज रणदीवने श्रीलंकेसाठी 12 टेस्ट सामन्यात 46 विकेट्स घेतले होते. तर 31 वनडेमध्ये 36 विकेट आणि 7 T20 सामन्यात 7 विकेट घेतल्या होत्या. 

4/7

भारतीय क्रिकेट चाहते हे सूरजला नो बॉलमुळे ओळखतात. ज्याने 99 धावांवर बॅटिंग करणाऱ्या वीरेंद्र सेहवागचं शतक पूर्ण होऊ नये म्हणून नो बॉल टाकला होता.  

5/7

भारताला विजयासाठी एक धावाची आवश्यकता होती. तेव्हा सेहवाग 99 धावांवर गोलंदाजी करत होता. जर सेहवागने एक धाव केली असती तर त्याच शतक पूर्ण झालं असतं. अशात श्रीलंकेचा क्रिकेटर दिलशानने कट रचला आणि सूरजला जाणून बुजून नो बॉल टाकायला सांगितला. सेहवागने त्या नो बॉलवर सुद्धा सिक्स मारला परंतु नो बॉल असल्याने अंपायरनी भारताला विजयी घोषित केले परंतु नो बॉलवर मारलेल्या धावा सेहवागच्या खात्यात जोडल्या गेल्या नाहीत आणि 99 वर नॉट आउट घोषित करण्यात आले. 

6/7

श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने सूरज रणदीवला एका सामन्यासाठी निलंबित केले. तर दिलशानवर यासाठी दंड ठोठावण्यात आला होता. सूरज रणदीवने श्रीलंकेसाठी 12 टेस्ट सामन्यात 46 विकेट्स घेतले होते. वीरेंद्र सेहवाग सोबत अशी फसवणूक केल्यामुळे सूरज रणदीव संपूर्ण जगात बदनाम झाला. 

7/7

परंतु त्याच्यानंतर त्याला 2011 वर्ल्डकप फाइनल साठी श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही सूरज क्रिकेटर म्हणून यशस्वी झाला नाही आणि त्यामुळे आज त्याला ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करावे लागत आहे.  तो सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात फ्रेंच-आधारित कंपनी ट्रान्सदेव येथे बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहे.