...म्हणून मी सॅनिटरी पॅड, टॅम्पॉन, व्हायब्रेटर घेऊन फिरतो; ऑरीनेच सांगितलं खरं कारण

पॉप्युलर इन्फ्लुएन्सर ऑरी उर्फ ओरहान अवात्रमणि याला कोणत्याच परिचयाची गरज नाही. सेलिब्रिटी असो बिझनेसमन असो किंवा स्टार किड्स ऑरी सगळ्यांमध्येच चर्चेचा विषय असतो. अगदी नेटिझन्सना देखील ऑरी कोण आहे? त्याची लाईफस्टाईल काय आहे याबाबत उत्सुकता असते. 

| Jul 19, 2024, 12:48 PM IST

ऑरी कायमच आपल्या प्रत्येक गोष्टीतून एक फॅशन स्टेटमेंट क्रिएट करत असतो. मग त्याचे कपडे असो, हेअर स्टाईल असो वा बॅग. ऑरीची बॅग देखील एक चर्चेचा विषय आहे. ऑरी आपल्या बॅगेतून अनेक फॅशन ट्रेंड सुरु करत असतो. पण ऑरी आपल्या बॅगेत नेमकं काय घेऊन फिरतो? याबतात चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Pinkvilla च्या एका मुलाखतीत ऑरीने Whats in my Bag असा एपिसोड केला आहे. यामध्ये ऑरीने आपल्या बॅगेतील सगळ्या गोष्टी काढून दाखवल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ऑरीच्या बॅगमध्ये महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे. ऑरी या गोष्टी का वापरतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर या बातमीत नक्की मिळेल. 

1/7

ऑरीच्या बॅगमध्ये पँटी लायनर

ऑरीची बॅग ही अलिबाबाची गुहा असल्यासारखं तुम्हाला वाटेल. कारण यामधून तो एक एक वस्तू काढतच होता. ऑरीच्या बॅगमध्ये पँटी लायनर देखील आहे. ऑरी सांगतो की, काखेत घाम आला की, तो खूप अस्वस्थ होतो. त्याला ते आवडत नाही. म्हणून तो पँटी लायनरचा वापर काखेतील घाम शोषून घेण्यासाठी करतो. असे केल्यामुळे त्याला लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत नाही.  पँटी लायनरचा वापर हा योनीमार्गातून पांढरा चिकट स्त्राव अतिप्रमाणात येत असेल तर महिला पँटी लायनरचा वापर करतात. 

2/7

व्हायब्रेटर

ऑरी आपल्या बॅगेत व्हायब्रेटर घेऊन फिरतो. बॅगेतील ही गोष्ट दाखवताना ऑरी म्हणाला की, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण मी व्हायब्रेटरचा वापर करतो. यामागचं कारण असं की, माझा व्हायब्रेटर हा फेस व्हायब्रेटर आहे. चेहऱ्याचा मसाज करण्यासाठी याचा वापर केला जातो. 

3/7

टॅम्पॉन

टॅम्पॉन ही गोष्ट देखील ऑरीच्या बॅगेत सहज आढळते. आपल्याला माहितच आहे, ऑरी हा सेलिब्रिटीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. अनेक महिला सेलिब्रिटीच्या त्याच्या मैत्रिणी आहे. अशावेळी मैत्रिणींना कधीही याचा वापर होऊ शकतो. म्हणून तो टॅम्पॉनचा वापर करत असल्याचं ऑरी सांगतो.  आपल्याला माहितच आहे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक महिला टॅम्पॉनचा वापर करतात. 

4/7

ऑरीच्या बॅगमध्ये तब्बल 3 फोन

ऑरी आपल्या महत्त्वाच्या फोनसोबतच दोन फोन घेऊन फिरतो. यामध्ये एक फोन हा फक्त गाणी ऐकण्यासाठी आहे. तर दुसऱ्या आयफोनमध्ये ऑरी क्रेडिट कार्ड मशीन आहे. हा फोन तो त्याच्या बॅगेत का ठेवतो याबद्दल बोलताना, तो म्हणतो, "मला एखाद्याला चार्ज करुन द्यायचे असेल किंवा शेवटच्या क्षणी फोटो काढायचे असल्यास, मी तो फोन लगेच चार्ज करु शकतो. "

5/7

स्टँप

ऑरी आपल्या बॅगेत एक स्टँप घेऊन फिरतो. तो ज्या व्यक्तीला भेटेल त्या व्यक्तीच्या हातावर तो स्वतःच्या नावाचा स्टँप मारतो. हा स्टँप अतिशय युनिक आहे. यामध्ये तो स्वतःची ओळख जपत असतो. आपल्याला कधी कोण सेलिब्रिटी भेटलं किंवा कुणी फॅन्स भेटले तर त्यांना पण ही खास गोष्ट लक्षात राहावी म्हणून यासाठी हा स्टँप तो कायम आपल्या बॅगेत घेऊन फिरतो. 

6/7

औषधं

ऑरीच्या बॅगेत असंख्य औषध, क्रिम आहेत. एवढंच नव्हे तर ऑरी आपल्या बॅगेत स्टिमर देखील घेऊन फिरतो. त्याला अनेकदा सर्दीचा त्रास होतो. तेव्हा नाक बंद झाल्यामुळे अस्वस्थ वाटू लागतं. अशावेळी त्याला कुठेही वाफ घेता यावी म्हणून तो स्टिमर घेऊन फिरतो. एवढंच नव्हे असंख्य क्रिम आणि औषध त्याच्या बॅगेत असतात. 

7/7

ज्वेलरी

आपल्याला माहितच आहे ऑरी आपल्या प्रत्येक गोष्टीमधून फॅशन क्रिएट असतो. ऑरीला ज्वेलरी घालायला आवडते. त्यामुळे तो आपल्या बॅगेत खूप कानातले, गळ्यातल्या गोष्टी घेऊन फिरतो. तसेच असंख्य छोट्या छोट्या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो.