Kargil VijayDin: त्या चुका झाल्या नसत्या तर... तब्बल 25 वर्षांनंतर मोठा खुलासा; कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने लष्कर अधिकारीच म्हणाले....
Kargil VijayDin: 'कारगील विजय दिना'ला 25 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनीसुद्धा दरम्यान झालेल्या चुकांची उजळणी केली. या चुका काय होत्या आणि त्यातून आपण काय शिकावं हे त्यांनी सांगितलं.
Kargil VijayDin: कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी युद्धाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
1/9
'दूध मांगोगे तो खीर देंगे, मगर कश्मीर मांगोगे तो चीर देंगे', पाकिस्तानला उद्देशून असलेला हा संवाद जवळपास सर्वच भारतीयांना माहित आहे. भारत- पाक सीमारेषेतील तणाव हा बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. हे सांगाण्याचं कारण म्हणजे येत्या 26 जुलैला कारगिल विजय दिनाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी कारगील युद्धाच्या आठवणी सांगितल्या आहेत. 1999मधील हे युद्ध तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरु होतं. जीवाची बाजी लावणाऱ्या अनेक सैनिकांना यात वीरमरण आलं. त्यामुळे हे युद्ध भाराताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचं युद्ध मानलं जातं.
2/9
चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी गुरुवारी माध्यमांशी याबाबत संवाद साधला आहे. ते म्हणाले की, कारगिल युद्धादरम्यान ज्या चुका झाल्या त्यातून शिकत त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. दहशतवाद्याचं मुख्य तळ हे काश्मीरचं जंगल आहे. त्यामुळे कारगिलच्या युद्धावेळी काश्मीरच्या जंगलांकडे दुर्लक्ष करुन भारताने मोठी चूक केली. सैन्य दलात रुजू होताना सैनिकांना तेथील वातारणाशी कसं जुळवून घ्यावं याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, मात्र हिमालय सर करणं तितकं सोपं नाही.
3/9
काश्मीरच्या खोऱ्यातच दहशतवाद्यांच तळ भक्कम आहे. त्यामुळे हिमालय पर्वतावरील वातावरणाचा आणि दहशतवाद्यांच्या हलचालींचा अंदाज घेण्यात सैन्य कमी पडत होतं. त्यामुळे कारगीलवर भारताने विजय मिळवला असला तरी झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. या युद्धातील झालेल्या चुका भविष्यात पुन्हा होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाची आहे, ही बाब चौहान यांनी अधोरेखित केली.
4/9
कारगील युद्धात झालेल्या चुका
सलग दोन महिने प्रतिकूल वातावरणात शत्रूला शह देणं सोपं नव्हतं. मात्र भारतीय सुरक्षा दलाने अशक्यचं शक्य करुन दाखवलं. यावेळी युद्धात काही चुका देखील झाल्या होत्या. सैन्य दलाचे निवृत्त प्रमुख अधिकारी एनसी विज यांनी त्यांच्या 'अलोन इन द रिंग' या पुस्तकात कारगील युद्धा दरम्यानचे काही प्रसंग सांगितले आहेत.
5/9
विज म्हणतात की, पाकिस्तानला शह देताना सीमालगतच्या तपास यंत्रणा कमी पडल्या होत्या. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानने आधुनिक शस्त्रसाठा कशा पद्धतीने मिळवला, याचा तपास करण्यात ही यंत्रणा कमी पडली. त्याचबरोबर सीमालगत भागात शत्रूच्या हलचालींवर करडी नजर ठेवण्यात या यंत्रणेला अपयश आलं. सुरक्षा दलात प्रत्येक परिस्थितीचं रिसर्च अॅन्डअॅनालिसिस डेटा (research and analysis) तयार केला जातो. हा डेटा युद्धापुर्वीच्या वातावरणावर चुकीचा बनवला गेला. या डेटानुसार पाकिस्तान कोणत्याही प्रकारे काश्मीरवर आक्रमण करणार नाही, असं लिहिण्यात आलं होतं.
6/9
युद्ध संपण्याच्या 72 तास आधी भारताने एका समितीची स्थापना केली. या समितीचे के. सुब्रमण्यमअध्यक्ष होते. एवढ्या शस्त्रासठ्यासह पाकिस्ताने भारताच्या सीमाभागात घुसखोरी कशी केली ? आणि यावर तोडगा काय? याबाबत संशोधनात्मक अहवाल सादर करणं हे या समितीचं काम होतं. के. सुब्रमण्यम यांनी सादर केलेला अहवाल अत्यंत धक्कादायक होता. अहवालात असं म्हटलं होतं की, सीमाभागतील सुरक्षा दलांच्या चौक्या, स्थानिक पोलीस आणि यंत्रणेला पाकिस्तानच्या घुसखोरीची आणि युद्धाची पुसटशीही कल्पना नव्हती.
7/9
8/9
9/9