बॉलिवूडमध्ये फ्लॉप असूनही आज करोडोंची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री; एकेकाळी होती सौंदर्यासाठी प्रसिद्ध, तुम्ही ओळखले का?

चित्रपटांमध्ये फ्लॉप असूनही, ही अभिनेत्री आज अब्जावधी रुपयांची मालकिण आहे. एकेकाळी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री, आज तिचा 53 वा वाढदिवस साजरी करत आहे. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री. 

Intern | Feb 24, 2025, 15:58 PM IST
1/8

pooja bhatt birthday special: 90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली ही अभिनेत्री त्या काळात अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती. त्या चित्रपटांमधील गाणी आजही 90 च्या दशकातील सर्वोत्तम गाण्यांमध्ये गणली जातात.

2/8

90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांच्या चित्रपट करिअरला यश मिळाले नाही. त्यापैकी एक अभिनेत्री आज तिचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या चित्रपट करिअरला विशेष यश न मिळालं असलं तरी आज ती अब्जावधींची मालकिण आहे. ही अभिनेत्री आहे पूजा भट्ट.   

3/8

24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या पूजाच्या वडिलांचे नाव महेश भट्ट आहे आणि आई किरण भट्ट होती. तिचा एक भाऊ राहुल भट्ट आहे. महेश भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नी सोनी राजदानपासून आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट आहेत आणि तिचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत.  

4/8

पूजा भट्टने 1989 मध्ये महेश भट्ट यांच्या 'डॅडी' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले, त्यापैकी 'चाहत', 'दिल है की मानता नहीं', 'बॉर्डर', 'सडक', 'जुनून', 'अंगारे', 'फिर तेरी कहानी याद आयी', 'सनम तेरी कसम', 'प्रेम दीवाने', 'जख्म' हे चित्रपट लोकप्रिय झाले.

5/8

त्यानंतर दिग्दर्शिका म्हणून तीने 'जिस्म 2', 'जिस्म', 'पाप', 'जिस्म 3', 'हॉलिडे', 'धोखा' आणि 'कजरारे' यांसारखे चित्रपट बनवले. तिचा शेवटचा अभिनय चित्रपट 'चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' (2022) होता.

6/8

तिचे चित्रपट करिअर फार खास असले तरी आज ती कोटींची मालकिण आहे. रिपोर्ट्सनुसार, तिचं एकूण संपत्ती सुमारे 50 कोटी रुपयांचे आहे. मुंबईत तिचं आलिशान फ्लॅट आहे आणि अनेक महागड्या गाड्या देखील आहेत.

7/8

पूजा 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये देखील दिसली होती, जिथे ती अंतिम फेरीत पोहोचली आणि त्या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली. रिपोर्ट्सनुसार, ती 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिवसाला 45 हजार रुपये घेत होती.

8/8

तिचं स्वतःचं होम प्रोडक्शन आहे, ज्याअंतर्गत ती वेब सिरीज, जाहिराती आणि इतर ब्रँड्सच्या चित्रीकरणाचे उत्पादन करते. ती मीडियाच्या जाहिरातींमधूनही कमाई करते आणि सोशल मीडियावरूनही चांगली कमाई करते.