ही काय पद्धत आहे? मधल्या फळीत येऊन शतके ठोकणाऱ्या सरफराज खानला संधी का नाही?

Sarfaraz Khan : सरर्फराजच्याच बरोबरीचे शुभमन गिल, ऋषभ पंत, इशान किशन सारखे खेळाडू टीम इंडियात खेळताना दिसत आहे. मग सरफराज संधी का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय

Jan 22, 2023, 18:24 PM IST
1/7

sarfaraz khan BCCI

रणजी सामन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या सरफराज खानचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड झाल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतके ठोकणाऱ्या टीम इंडियामध्ये प्रवेश का मिळत नाही, असा दबाव त्याच्या चाहत्यांकडून बीबीसीआयवर वाढत आहे.

2/7

sarfaraz khan play

25 वर्षांचा असणाऱ्या सरफराज खानचा देशांतर्गत क्रिकेटमधला विक्रम पाहता तो बराच काळापासून क्रिकेट खेळत असल्यासारखे वाटते. एवढ्या लहान वयातही त्याने धडाकेबाज शतके झळकावली असली तरी त्याला टीम इंडियात संधी मिळत नाहीये

3/7

sarfaraz khan century

टीम इंडियाच्या मधल्या फळीसाठी त्याला अधिक तयारी करावी लागेल, असा युक्तिवादही केला जात आहे. पण आकडेवारीनुसार पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरुन येऊनही त्याने शतके ठोकली आहेत

4/7

sarfaraz khan age

जर अनुभवामुळे सरफराजला संधी देण्याचे टाळले जात असेल तर ते अन्यायकारक ठरेल. कारण त्याच्यापेक्षा लहान खेळाडूही सध्या टीम इंडियात खेळत आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत, इशान किशन सारखे खेळाडू देखील याच वयोगटातील आहेत.

5/7

sarfaraz khan fitness

सरफराजच्या निवडीबाबत आणखी एक तर्क आहे तो म्हणजे तंदुरुस्तीबाबतचा. कारण सरफराज खानचे वजन जास्त आहे. दुसरीकडे भारतीय संघ अलीकडच्या काळात फिटनेसबाबत खूप बारकाईने लक्ष देत आहे. यामध्ये यो-यो टेस्टसारख्या फिटनेस टेस्टचाही समावेश करण्यात आला आहे.  

6/7

sarfaraz khan weight

मात्र त्याच्या वजनामुळे त्याच्या खेळीवर कुठलाच परिणाम होत नसल्याने त्याची निवड का थांबवली जातेय असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. सुनील गावस्कर यांनीही निवडकर्त्यांना टोला लगावताना तुम्हाला पातळ माणूस हवा असेल तर मॉडेल शोधा असे म्हटले होते.

7/7

Sarfaraz Khan middle order

त्यामुळे सध्याच्या टीम इंडियावर नजर टाकली आणि सरफराज खानला जागा मिळाली तर तो मधल्या फळीत बसू शकतो. तसेच तो संघाला अडचणीतून बाहेर काढण्यास सक्षम देखील आहे.