30+ महिलांसाठी 6 फळे: निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फायदेशीर

महिलांचे वय वाढल्यावर म्हणजेचं 30 नंतर, शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल बदल, मेटाबॉलिझम मंदावणे आणि त्वचेतील ओलावा कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि सौंदर्य राण्यासाठी या फळांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरु शकते. जाणून घेऊया ही 6 फळे कोणती आहेत.

Intern | Feb 24, 2025, 13:20 PM IST
1/8

वयाच्या 30 नंतर शरीर निरोगी आणि सुंदर ठेवणे कठीण होऊ शकते. पण काही फळे या महिलांसाठी आरोग्यदायी आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात, जी तुमचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि सौंदर्य राखण्यासाठी मदत करू शकतात.   

2/8

अ‍ॅवोकॅडो

अ‍ॅवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला ताजे ठेवण्यास मदत करतात. हे फळ मेटाबॉलिझम वाढवते आणि त्वचेला आवश्यक ओलावा प्रदान करते. अ‍ॅवोकॅडोच्या सेवनाने वयाच्या परिणामांची तीव्रता कमी होते आणि कॅल्शियमची पातळी सुधरते.

3/8

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीरातील हानिकारक रॅडिकल्स दूर करतात. हे फळ त्वचेला नैसर्गिक चमक मिळवते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले असते. तसेच ब्लूबेरी मेंदूच्या कार्यक्षमतेला उत्तेजन देऊन मानसिक ताजेपणाही वाढवते.  

4/8

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन A आणि C भरपूर असतात, जे कोलेजन उत्पादन वाढवतात आणि त्वचेला चमकदार बनवतात. यामध्ये असलेले फायबर्स पचनक्रिया सुधारतात आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करतात.  

5/8

सफरचंद

'दररोज एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवतो' या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे, सफरचंद तुमच्या आरोग्याचे संरक्षण करते. यामध्ये फायबर्स आणि पोटॅशियमचे प्रमाण असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तसेच सफरचंद त्वचेला स्वच्छ आणि ताजे ठेवते. तसेच वजन कमी करण्यास मदत करते.

6/8

संत्री

संत्री हे व्हिटॅमिन C चं उत्तम स्रोत आहेत. जे त्वचेला हायड्रेशन देऊन ताजेतवाने ठेवतात. संत्री खाल्ल्याने तुम्ही आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळवू शकता.

7/8

अननस

अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते, जे पचन प्रक्रिया सुधारते आणि श्वसन संबंधित समस्या दूर करते. हे फळ वजन कमी करण्यात आणि त्वचेला लुसलुशीत आणि चमकदार ठेवण्यात मदत करते

8/8

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)