छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली? मराठी आहे नाव

छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानाची गाथा सांगणारा छावा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर, रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. 

Mansi kshirsagar | Feb 26, 2025, 14:55 PM IST

छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानाची गाथा सांगणारा छावा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर, रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. 

1/7

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली? मराठी आहे नाव

who is first actor to played Chhatrapati Shivaji maharaj role in marathi industry

छावा सिनेमानंतर संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सर्च केले जात आहे. तसंच, मोठ्या पडद्यावर सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे पेव फुटले आहे. 

2/7

 लवकरच अभिनेता रितेश देशमुख शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेता रिषभ शेट्टीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण तुम्हाला माहितीये का मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराज कोणी साकारले होते?

3/7

 1952 साली छत्रपती शिवाजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. भालजी पेंढारकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते. यात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी साकारली होती.

4/7

आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की, डोळ्यासमोर शिवरायांच्या वेशातले चंद्रकांत मांढरे येतात. पन्हाळ्यावर 'छत्रपती शिवाजी' या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. 

5/7

चंद्रकांत मांढरे यांचे जन्म 13 ऑगस्ट 1913 रोजी झाला होता. ते मुळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. 

6/7

सावकारी पाश या त्यांचा पहिला चित्रपट होता. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी सिनेमांतही काम केले आहे. बनगडवाडी हा चंद्रकांत यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 17 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांचे निधन झाले. 

7/7

चंद्रकांत मांढरे हे त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व, तेजस्वी चेहरा आणि संवादाची लकब यामुळं ते सिनेरसिकांत प्रसिद्ध होते.