लहान मुलांचे जावळ का काढलं जातं? कितव्या वर्षी करावा हा विधी?

बाळाच्या जन्मानंतर एका ठराविक कालावधीनंतर बाळाचे जावळ करण्याची पद्धत आहे. बाळाचे जावळ काढणे हा एक प्रकारे सोहळाच असतो. पण लहान मुलांचे जावळ का व कधी काढावे जाणून घेऊया. 

Mansi kshirsagar | Jul 18, 2024, 14:29 PM IST

Baby's First Mundan: बाळाच्या जन्मानंतर एका ठराविक कालावधीनंतर बाळाचे जावळ करण्याची पद्धत आहे. बाळाचे जावळ काढणे हा एक प्रकारे सोहळाच असतो. पण लहान मुलांचे जावळ का व कधी काढावे जाणून घेऊया. 

1/8

लहान मुलांचे जावळ का काढलं जातं? कितव्या वर्षी करावा हा विधी?

when to do mundan for baby in india and what is significance

बाळ नऊ महिने आईच्या गर्भात वाढत असते. नऊ महिन्यानंतर बाळाचा जेव्हा जन्म होतो. तेव्हा त्याच्या डोक्यावर जन्मतः केस असतात. पण बाळ एक वर्षांचे किंवा काही महिन्यांचे झाले की बाळाचे जावळ केले जाते. हिंदू धर्मात बऱ्याच कालावधीपासून ही प्रथा सुरू आहे. 

2/8

when to do mundan for baby in india and what is significance

बाळाचा जावळ संस्कार हा हिंदू धर्मात वर्णन केलेल्या 16 संस्कारापैकी आहे. हिंदू धर्मात वर्णन केल्याप्रमाणे, जावळ केल्याने मुलाला जन्माच्या वेळी आढळणाऱ्या अशुद्धतेपासून मुक्त करतात. तसंच, जावळ केल्यानंतर बाळाचा व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणे मिळते. तसंच, त्याची अन्यही कारणे आहेत. 

3/8

when to do mundan for baby in india and what is significance

बाळाचे जन्मतःच असेलेले केस हे पातळ आणि कमकुवत असतात. बाळाचे जावल केल्याने केसांची चांगली वाढ होते आणि केस मजबूत होतात. 

4/8

when to do mundan for baby in india and what is significance

जावळ केल्यानंतर बाळाला व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळते. बाळाच्या वाढीच्या काळात व्हिटिॅमिन डी मुबलक प्रमाणात शोषले जाते. त्यामुळं मेंदुची वाढ आणि विकास होतो. बाळ हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. 

5/8

जावळ कधी करावे

when to do mundan for baby in india and what is significance

बाळाचे जावळ हे साधारणपणे एक वर्षानंतरच करावे. कारण त्याआधी बाळाचे डोके पूर्ण भरलेले नसते. बाळ एक वर्षांचे झाल्यानंतर डोके टणक होते. अशावेळी जावळ करणे योग्य मानले जाते

6/8

जावळ कसे करावे

when to do mundan for baby in india and what is significance

जावळ करण्यासाठी एक शुभमुहूर्त ठरवावा. जावळ करताना होम हवन केले जातात. बाळाची आई आणि मामाच्या मांडीवर घेऊन जावळ काढले जाते

7/8

ही काळजी घ्या

when to do mundan for baby in india and what is significance

बाळाचे जावळ करण्याच्या आधी त्याला दूध किंवा भरडी भरवून घ्या. बाळाचे पोट भरलेले असल्यास तो चिडचिड करणार नाही

8/8

काय काळजी घ्यावी

when to do mundan for baby in india and what is significance

बाळाचे केस काळजीपूर्वक काढण्यासाठी तज्ज्ञ न्हाव्याला बोलवावे. तसंच, जावळ काढल्यानंतर बाळाच्या डोक्याला हळदीचा व चंदनाचा लेप लावावा (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)