अनंत अंबानीनं लग्नात घातली शाहजहांची Original कलगी! किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांचं प्री-वेडिंग हे मार्चमध्येच सुरु झालं. आता त्या दोघांचं लग्न झालं असून आता अधिकृतरित्या ते दोघं आता एक झाले आहेत. या कार्यक्रमा दरम्यान, अंबानी कुटुंबाच्या फॅशन आणि दागिन्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. 

Diksha Patil | Jul 18, 2024, 13:15 PM IST
1/7

अंबानी कुटुंब हे त्यांचा परंपरेसाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी ओळखले जातात. त्यांचे कार्यक्रम देखील तितकेच खास असतात. त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अनंतनं त्याच्या लग्नात आई नीताच्या दागिन्यांपैकी एक दागिणा घातला होता. 

2/7

अनंतनं एक बाजूबंद घातलं होतं जे मूळ मुगल सम्राट शाहजहाची कलगी होती. माणिक्ये, हीरे आणि प्राचीन स्पिनेलपासून बनवण्यात आलेल्या या सुंदर बाजूबंदची किंमत ही जवळपास 200 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातं आहे. 

3/7

मे 2024 मध्ये नीता अंबानी या मुंबईतील मिस वर्ल्ड या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्यांच्या चॅरिटी कार्यांसाठी 'ब्यूटी विद परपज ह्यूमॅनिटेरियन अवार्ड' से सन्मानित करण्यात आलं. या खास दिवसासाठी नीता अंबानी यांनी काळी बनारसी साडी नेसली होती ज्यावर सोन्याचं आणि जरीचं खूप सुंदर काम केलं होतं.  

4/7

साडीसोबत त्यांनी मॅचिंग ब्लाऊज परिधान केलं होतं आणि मेकअप देखील हल्का केला होता. तर केस मोकळे सोडले असू काळी टिकली लावली होती. त्यांनी कानात झुमके आणि हातात कडा घातला होता. मात्र, त्यांच्या संपूर्ण लूकमध्ये कोणत्या गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले तर ती कलगी होती जी त्यांनी बाजूबंद म्हणून घातली होती. त्या कलगीनं त्यांची शोभा आणखी वाढवली.   

5/7

कलगीविषयी बोलायचं झालं तर परंपरेनुसार, कलगी ही पगजी अर्थात फेट्यासोबत घातली जाते. त्याचं कारण म्हणजे त्याची शाही शान आणखी वाढेल. तर कपाळावर असणाऱ्या या दागिन्यांचे मुघलांमध्ये महत्त्वाचे स्थान, सन्मान आणि राज्याच्या सुंदरतेचं प्रतिक मानले जात होते. 

6/7

अनंतनं जी कलगी घातली होती, त्याकडे अनेकांचे लक्ष दिले. इन्स्टाग्राम पेज टोपोफीलियाच्या म्हणण्यानुसार, या कलगीची लांबी 13.07 सेमी आणि रुंदी ही 19.08 सेमी आणि त्यात माणिक, स्पिनेल आणि हीऱ्यांसारखे रत्न आहेत. 

7/7

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात हिंदू संस्कृती आणि परंपरा दिसल्या. आधुनिक फॅशनला ऐतिहासिक आणि सांस्कृतीक अशा सगळ्या गोष्टींना एकत्र करण्यात आलं होतं. या लग्नाचे सगळे कार्यक्रम खरंच सगळ्यांच्या लक्षात राहणारे होते.