माजी मुख्यमंत्र्यांची सून, पण लग्नाच्या 11व्या दिवशीच पतीला गोळी लागली, 25 व्या वर्षीच टॉपच्या अभिनेत्रीवर वैधव्य

सिनेसृष्टीत दीर्घकाळापर्यंत आपलं स्टारडम टिकवून ठेवणं खूप अवघड असतं. खूप कमी अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी एखाद्या मोठ्या कलाकारासह त्यांचा लोकप्रियता टिकवून ठेवली. हेमा मालिनी, नीतू सिंह यांना टक्कर देणाऱ्या एका अभिनेत्रीने लग्नाला प्राथमिकता देत सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. 

Mansi kshirsagar | Oct 14, 2024, 13:35 PM IST

सिनेसृष्टीत दीर्घकाळापर्यंत आपलं स्टारडम टिकवून ठेवणं खूप अवघड असतं. खूप कमी अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी एखाद्या मोठ्या कलाकारासह त्यांचा लोकप्रियता टिकवून ठेवली. हेमा मालिनी, नीतू सिंह यांना टक्कर देणाऱ्या एका अभिनेत्रीने लग्नाला प्राथमिकता देत सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. 

1/7

माजी मुख्यमंत्र्यांची सून, पण लग्नाच्या 11व्या दिवशीच पतीला गोळी लागली, 25 व्या वर्षीच टॉपच्या अभिनेत्रीवर वैधव्य

When Kishore Kumar proposed marriage to Leena Chandavarkar on their 1st meeting

अभिनेत्रीच्या लग्नाला 11 दिवसच झाले होते. त्याच 11 दिवसांत असं काही घडलं की तिच्या पतीचा मृत्यू झाला. तरुणपणातच ती विधवा झाली. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया. 

2/7

When Kishore Kumar proposed marriage to Leena Chandavarkar on their 1st meeting

 अभिनेत्रीचे नाव लीना चंदावकर असं आहे. मराठमोळ्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्या चांगलाच जम बसवला होता. तिच्या सौंदर्याने तिने अनेक बड्या बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर दिली होती. 

3/7

When Kishore Kumar proposed marriage to Leena Chandavarkar on their 1st meeting

लीना चंदावकर ने 1968 साली मन का मीत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते. तर, सुनील दत्त हे चित्रपटाचे निर्माते होते. 

4/7

When Kishore Kumar proposed marriage to Leena Chandavarkar on their 1st meeting

 लीना चंदावकरने 1984 मध्ये सिद्धार्थ बांदोडकरसोबत लग्न केले. लग्नाच्या वेळी लीना यांचे वय 24 होते. सिद्धार्थदेखील एका राजकीय पक्षासोबत जोडले होते. त्यांचे वडील दयानंद बांदोडकर गोवाचे पहिले मुख्यमंत्री होते. 

5/7

When Kishore Kumar proposed marriage to Leena Chandavarkar on their 1st meeting

लीना यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणे सोडले होते. लग्नाच्या 11व्या दिवशीच त्यांचे पती बंदूक साफ करत असताना चुकून त्यांनी गोळी चालवली.

6/7

When Kishore Kumar proposed marriage to Leena Chandavarkar on their 1st meeting

 सिद्धार्थ बांदोडकर यांच्यावर 11 महिन्यांपर्यंत उपचार सुरू होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. 25व्या वर्षीच लीना चंदावकर विधवा झाल्या. अनेकांनी पतीच्या मृत्यूला त्यांनाच जबाबदार धरले होते. त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांना टोमणे मारत होते. 

7/7

When Kishore Kumar proposed marriage to Leena Chandavarkar on their 1st meeting

पतीच्या मृत्यूनंतर लीना चंदावकर यांनी पुन्हा चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. दिलीप कुमार यांची मुख्य भूमिका असलेला बैराग या चित्रपटातून कमबॅक केले. त्यानंतर अजनबीमध्ये किशोर कुमार यांच्यासोबत काम केले. तिथेच त्यांचे प्रेम जुळले आणि 20 वर्ष मोठ्या असलेल्या किशोरसोबत त्यांनी लग्न केले. लीना या किशोर कुमार यांच्या चौथ्या पत्नी झाल्या.