'या' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आईने निर्मात्याला दिली होती धमकी

अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्यांच्या आईने चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी दिली होती. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

| Jan 04, 2025, 17:31 PM IST
1/7

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे मेगास्टार म्हणून ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

2/7

1992चा चित्रपट

यामध्ये चित्रपटांमध्ये 'खुदा गवाह' या चित्रपटाचेही नाव आहे. हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट होता. 

3/7

खुदा गवाह

'खुदा गवाह' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत श्रीदेवी देखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाची निर्मिती मनोज देसाई यांनी केली होती. नुकतेच त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक किस्सा सांगितला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की चित्रपटाचे शूटिंग सोपे नव्हते. 

4/7

शूटिंग

ते बॉलिवूड हंगामासोबत संवाद साधताना म्हणाले की, या चित्रपटाचे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये होणार होते. त्यावेळी तिथे खूप धोका होता.   

5/7

निर्मात्यांना धमकी

चित्रपटाच्या शूटिंगबाबत जेव्हा दोन्ही कलाकारांच्या आईंना समजले की, अफगाणिस्तानमधील वातावरण चांगले नाही तेव्हा त्यांनी मनोजला धमकी दिली. 

6/7

अमिताभ बच्चन आई

त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले होते. तेव्हा अमिताभ बच्चनच्या आई त्यांना सांगितले की, तिथे काय झाले आणि जयाने पांढरी साडी नेसली तर तुम्ही तिथे आत्महत्या करा. 

7/7

श्रीदेवी आई धमकी

यासोबतच श्रीदेवीच्या आईने देखील मनोज देसाईंना धमकावत काही झाले तर परत येऊ नकोस, अन्यथा मी तुला जीवे मारेन. असे सांगितले.