व्हाइट हाऊसपेक्षा आलिशान ब्लेअर हाऊस, अमेरिका दौऱ्यावर असलेले PM Modi याच बंगल्यात राहणार

US Blair House: अमेरिकेतील ब्लेअर हाऊस व्हाईट हाउसपेक्षा खूप सुंदर असल्याचं म्हटलं जातं. पीएम मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असताना ब्लेयर हाउसमध्ये थांबणार आहेत. हे घर व्हाइट हाऊसच्या अगदीच समोर आहे. 

Diksha Patil | Feb 13, 2025, 18:22 PM IST
1/7

ब्लेयर हाऊसला अमेरिकामध्ये राष्ट्राध्यक्षांचे गेस्ट हाऊस म्हणतात. शपथग्रहण होण्यापूर्वी निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष काही काळ येथे थांबतात. याशिवाय, व्हाइट हाऊसला भेट देणारे परदेशी मंत्रीही ब्लेअर हाऊसमध्येच राहतात.

2/7

ब्लेअर हाऊस फाउंडेशननुसार, या घराचे व्यवस्थापन अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रोटोकॉल प्रमुख कार्यालय आणि जनरल सर्व्हिस अॅडमिनिस्ट्रेशनच्या वतीने केले जाते.

3/7

राष्ट्राध्यक्षच पाहुण्यांना येथे राहण्याचे निमंत्रण देतात. ब्लेअर हाऊसमध्ये एकूण 119 खोल्या आहेत.

4/7

ब्लेअर हाऊस व्हाइट हाऊसच्या अगदी समोर आहे. त्याला व्हाइट हाऊसपेक्षाही जास्त भव्य मानले जाते. गेल्या दोन शतकांपासून हे घर अमेरिकेच्या राजकारण, सांस्कृतिक इतिहासची साक्षीदार राहिले आहे. 

5/7

1824 मध्ये अमेरिकन सैन्याचे आठवे सर्जन जनरल जोसेफ लोवेल यांनी हे घर खासगी निवासस्थान म्हणून वापरले होते. 1836 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचे सल्लागार फ्रान्सिस ब्लेअर यांनी हे घर विकत घेतले, त्यानंतरच या वास्तूला 'ब्लेअर हाऊस' हे नाव मिळाले. 

6/7

1942 मध्ये अमेरिकन सरकारने हे घर खरेदी केले आणि तेव्हापासून हे अमेरिकन राजकारणाचा एक भाग बनले. ब्लेअर हाऊस चार मजली इमारत आहे. बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने पाहिले तर हे व्हाइट हाऊसपेक्षा मोठे आहे. येथे 14 गेस्ट हाऊस आहेत, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच येथे 35 बाथरूम आहेत.

7/7

ब्लेअर हाऊसच्या आत सुंदर पेन्टिंग, झुंबर आणि आलिशान सजावट आहे. येथे खास शेफदेखील ठेवले जातात. ब्लेअर हाऊसच्या सजावटी आणि देखभालीसाठी सरकारी निधी वापरण्यात येतो.