स्मार्टफोनमधील 'या' हालचाली फोन हॅक झाल्याची लक्षणं; चुकूनही करु नका दुर्लक्ष

Smartphone Hacking: आजकाल सर्वजण स्मार्टफोनचा वापर करतात. पण हे स्मार्टफोन हॅकही केले जाऊ शकतात. जर तुमचा फोन हॅक झाला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसतील. तुमचाही फोन हॅक झालाय का? किंवा तो झाल्यास काय करावं हे समजून घ्या.   

Shivraj Yadav | Nov 04, 2024, 17:11 PM IST
1/12

Smartphone Tips and Tricks: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हॅकिंग ही फार मोठी समस्या झाली आहे. तुमचा फोन हॅक केल्यानंतर त्याचा ताबा घेतला जातो. म्हणजेच याचा अर्थ तुमच्या मोबाईलमधील पर्सनल डेटा, फोटो, व्हिडीओ, ईमेल यासह बँक खात्यांची खासगी माहिती एका अनोळख्या व्यक्तीच्या हाती लागते. अशात तुमची खासगी माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता असते. जेव्हा तुमचा फोन हॅक होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसतात. तुमचाही फोन हॅक झालाय का? किंवा तो झाल्यास काय करावं हे समजून घ्या.   

2/12

विचित्र ॲप्स

विचित्र ॲप्स

तुमच्या फोनवर तुम्ही कधीही इन्स्टॉल न केलेले ॲप्स इन्स्टॉल केले असल्यास, ते तुमचा फोन हॅक झाल्याचे लक्षण असू शकते.  

3/12

बॅटरी वेगाने संपणं

बॅटरी वेगाने संपणं

जर तुमचा फोन पूर्वीपेक्षा खूप वेगाने डिस्चार्ज होत असेल तर हे स्मार्टफोन हॅक झाल्याचे लक्षण असू शकते. कोणीतरी तुमच्या नकळात डेटा वापरत असण्याची शक्यता आहे.  

4/12

फोन चालू किंवा बंद होणं

फोन चालू किंवा बंद होणं

जर तुमचा फोन कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून चालू किंवा बंद होत असेल तर, हेदेखील एक लक्षण असू शकते की कोणीतरी तुमचा फोन रिमोटली कंट्रोल करत आहे.  

5/12

अचानक डेटा संपणं

अचानक डेटा संपणं

जर तुमचा डेटा पॅक कोणत्याही कारणाशिवाय खूप लवकर संपत असेल, तर असं होऊ शकते की कोणीतरी तुमचा डेटा वापरत आहे.  

6/12

फोन स्लो होणं

फोन स्लो होणं

जर तुमचा फोन पूर्वीपेक्षा खूप हळू झाला असेल, तर कदाचित कोणीतरी बॅकग्राउंडमध्ये प्रोसेसर वापरत असेल.  

7/12

पॉप-अप जाहिराती

पॉप-अप जाहिराती

जर अचानक तुमच्या फोनवर खूप पॉप-अप जाहिराती दिसू लागल्या, तर हे फोन हॅक झाल्यामुळे देखील असू शकते.  

8/12

अनोळखी नंबरवरून कॉल येणं

अनोळखी नंबरवरून कॉल येणं

फोन हॅक असल्यास तुम्हाला अज्ञात नंबरवरून कॉल येऊ शकतात.  

9/12

अनोळखी ॲप्स हटवा

अनोळखी ॲप्स हटवा

तुमच्या फोनमधून सर्व अनोळखी ॲप्स ताबडतोब हटवा.  

10/12

फॅक्टरी रीसेट

फॅक्टरी रीसेट

जर तुमचा फोन हॅक झाला असेल तर तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रीसेट करू शकता.  

11/12

पासवर्ड बदला

पासवर्ड बदला

सर्व ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड त्वरित बदला. विशेषत: तुम्ही तुमच्या फोनवरून लॉग इन केलेल्या खात्यांचे पासवर्ड तात्काळ बदलून घ्या.  

12/12

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर

चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा आणि तुमचा फोन नियमितपणे स्कॅन करा.