84 लाख भारतीयांचं व्हॉट्सअ‍ॅप बंद, तुमचं नाही ना?

व्हॉट्सअॅपने 84 लाखांहून अधिक भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. काय आहे या बंदी मागचे कारण? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Feb 21, 2025, 19:27 PM IST
1/7

जगभरात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. अशातच आता व्हॉट्सअ‍ॅपने 30 दिवसांमध्ये 84 लाख अकाउंट्स बंद केले आहेत. 

2/7

व्हॉट्सअ‍ॅपच्या मूळ कंपनी Meta ने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सला घोटाळा, चुकीची माहिती आणि बेकायदेशीर वापरामुळे ही खाती बंद करण्यात आली आहेत. 

3/7

दरम्यान, भारतीय आयटी नियमांचे पालन करण्यासाठी कंपनी दरमहिन्याला अशी पद्धतीने कारवाई करते. व्हॉट्सअ‍ॅप हे भारतातील एक महत्वपूर्ण इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. 

4/7

या प्लॅटफॉर्मचा काही लोक बेकायदेशीर पद्धतीने वापर करतात. ज्यामध्ये हे अकाउंट्स घोटाळा आणि बेकायदेशीर काम करत असतात. त्यामुळे कंपनी अशा लोकांचे अकाउंट्स ब्लॉक करते. 

5/7

मेटाच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, कंपनीने 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत 84.5 लाख  खाती बंद केली आहेत. 

6/7

हे सर्व अकाउंट्स भारतीय आहेत. नियमांचे पालन न केल्यामुळे 16.6 लाख अकाउंट्स बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने आपल्या कारवाईचा भाग म्हणून 16 लाख खाती बंद केली आहेत. 

7/7

तर लोकांच्या तक्रारी आणि इतर चौकशीनंतर इतर खात्यांवर बंदी घालण्यात आला आहे. तर काही खात्यांना नियमांचे उल्लघंन  केल्याप्रकरणी बंद करण्यात आले आहे. त्यासोबतच थर्ड पार्टी अॅप आणि ऑटोमेटेड मेसेज करणाऱ्यांवर देखील कंपनीने कारवाई केली आहे.