पृथ्वीचा आजपर्यंतचा सर्वात सुंदर फोटो; 8 दिवसात चंद्रावर लँड होणाऱ्या NASA च्या प्रायव्हेट मून लँडरची आश्चर्यकारक कामगिरी

IM-1 : NASA च्या प्रायव्हेट मून लँडरने पृथ्वीचे सुंदर छायाचित्र कॅप्चर केले आहेत. 

Feb 18, 2024, 21:09 PM IST

IM-1 SpaceX First Private Moon Mission: अमेरिकन स्पेस एजन्सी अर्थात NASA ने तब्बल 52 वर्षांनंतर एक चंद्र मोहिम हाती घेतली आहे. नासाचे IM-1 लँडर चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. IM-1 लँडर हे एका प्रायव्हेट कंपनीचे मून लँडर आहे. या लँडरने पृथ्वीचा आजपर्यंतचा सर्वात सुंदर फोटो कॅप्चर केला आहे. 

1/7

इन्ट्युटिव्ह मशिन्स (IM) नावाच्या कंपनीच्या मदतीने IM-1 हे प्रायव्हेट मून लँडर लाँच केले आहे. 

2/7

तब्बल 52 वर्षानंतर NASA ने आपले यान चंद्रावर पाठवले आहे. यामुळे नासाच्या या मून मिशनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

3/7

NASA ने IM या कंपनीसोबत 118 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 979.52 कोटींचा करार केला होता. यानंतर IM कंपनीने ओडिसियस मून लँडर तयार केले.  

4/7

 IM-1 Odysseus Private Lunar Lander ही एकूण 16 दिवसांची मोहिम आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर हे स्पेसक्राफ्ट 7 दिवस संशोधन कणार आहे. 

5/7

अवघ्या 8 दिवसात हे यान चंद्रावर पोहचणार आहे. 22 फेब्रुवारी रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान लँडिग करणार आहे. 

6/7

 IM-1 या लँडरने चंद्राच्या कक्षेत पोहचण्याआधी पृथ्वीचे सुंदर फोटो कॅप्टर केले आहेत. 

7/7

15 फेब्रुवारी रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून SpaceX Falcon 9 रॉकेटच्या मदतीने IM-1 लँंडरचे प्रक्षेपण करण्यात आले.