'सिंघम अगेन' चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटात कोणते-कोणते कलाकार दिसणार आहे. त्यांची नावं हळू हळू सगळ्यांसमोर आली आहेत. मात्र, या नव्या कलाकारांनी हा चित्रपट करण्यासाठी किती मानधन घेतलं याची चर्चा सुरु आहे. त्याविषयी जाणून घेऊया.   

| Feb 18, 2024, 18:26 PM IST
1/7

सिंघम फ्रेंचायझी

सगळ्यात आधी 2011 मध्ये 'सिंघम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2014 'सिंघम रिटर्न्स' प्रदर्शित झाला होता. आता 10 वर्षांनी या चित्रपटाचा तिसरा भाग येतोय. 

2/7

हे कलाकार दिसणार!

'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगणसोबत रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण हे कलाकार दिसणार आहेत.   

3/7

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर या चित्रपटातून पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्यानं 5 ते 7 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते. 

4/7

करीना कपूर खान

करीन कपूर खानला या चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी मानधन मिळाल्याचे म्हटले जाते. 

5/7

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणला या चित्रपटासाठी 15-20 कोटी मानधन देण्यात आल्याचं म्हटलं जातं. 

6/7

किती आहे बजेट?

या चित्रपटाचं एकूण बजेट हे 250 कोटींचं असल्याचं म्हटलं जातं. 

7/7

कधी होणार प्रदर्शित?

हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (All Photo Credit : social Media)