Astrology : 30 दिवस 'या' राशींवर राहणार संकट! करिअरसाठी करावा लागेल संघर्ष

Astrology : तब्बल 1 वर्षानंतर सूर्य कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि इथे यावेळी शनि ग्रहासमोर येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शनी यांची कुंभ राशीत युती काही राशींसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  

Diksha Patil | Feb 11, 2025, 18:42 PM IST
1/7

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या काळात मित्रांसोबत आणि व्यावसायिक भागीदारांसोबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या योजनांमध्ये सुधारणा केल्यास फायदा होऊ शकतो. अहंकारामुळे जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. काही मतभेद असल्यास त्यावर चर्चा करुन त्या समस्या सोडवाव्या. आरोग्याच्या बाबतीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. 

2/7

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी या काळात अनपेक्षित वारसा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकतं आणि नोकरीत स्थिरता येऊ शकते. व्यवसायात उच्च नफा मिळू शकतो आणि व्यावसायिकतेमुळे यश मिळू शकते. जोडीदारासोबत प्रामाणिकपणे वागल्यास नाते मजबूत होईल.   

3/7

वृश्चिक

या काळात वृश्चिक राशीच्या लोकांची व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. तथापि, आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवू शकतात. विशेषतः पोटाशी संबंधित आजार. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. 

4/7

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी या काळात आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संबंध प्रस्थापित होतील. तथापि, आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवू शकतात. विशेषतः हाडे आणि त्वचेच्या आजार. नवीन संधी मिळतील, परंतु निर्णय घेताना सावधानता बाळगावी. ध्यान आणि योगाचा अवलंब करावा. 

5/7

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

6/7

मीन

मीन राशीच्या लोकांना या काळात आरोग्याच्या बाबतीत समस्या उद्भवू शकतात आणि विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादविवाद टाळावेत आणि निर्णय घेताना सावधानता बाळगावी. 

7/7

मीन राशीच्या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी?

 शनिवारी गरजू व्यक्तींना मदत करावी. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि 'ॐ घृणी सूर्याय नमः' मंत्राचा जप करावा. शनिवारी हनुमान चालिसा पठण करावे.