PHOTO : 55,41,83,28,00,000 रुपयांची गुंतवणूक, 40 आलिशान हॉटेल्स, गोल्फ कोर्स; असं असेल सौदी अरेबियाचं 'हे' नवीन शहर

सौदी अरेबिया लवकरच त्यांच्या दिरियाह या शहराला पुन्हा वसवणार आहे. यासाठी ते अब्जावधी रुपये खर्च करणार आहेत. इतकंच नाही तर अनेक भारतीय कंपन्या येथे गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.

Diksha Patil | Feb 11, 2025, 20:33 PM IST
1/7

सौदी अरेबियाच्या या शहरात 40 लग्झरी हॉटेल, 1000 पेक्षा जास्त दुकानं आणि 150 रेस्टॉरंट आणि कॅफे बनवण्यात येणार आहेत. त्यासोबत इथे 1 युनिव्हर्सिटी, कला-सांस्कृतित संपन्न असतील अशा ठिकाणं, म्युझियम आणि एक ओपेरा हाउस देखील बनवण्यात येणार आहे. 

2/7

या शहरात 20,000 लोकं बसू शकतं असं एक ठिकाण बनवण्यात येणार आहे. त्याशिवाय गोल्फ कोर्स आणि घोडेस्वारीती व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. या ठिकाणी शहर वसवण्यासाठी कमीत कमी 63.2 बिलियन डॉलर्सचा खर्च करण्यात येणार आहे. 

3/7

प्रोजेक्टचं महत्त्व एकच आहे की सौदी राज्याचे ऐतिहासिक जन्मस्थान असलेल्या या शहराचे पुनर्संचयित करणे हा खरा या प्रकल्पाचा उद्देश आहे. 

4/7

त्याशिवाय या ऐतिहासिक ठिकाणाचे पर्यटन स्थळात रूपांतर करावे लागेल. भारतीय गुंतवणूकदारांसाठी या ठिकाणी गुंतवणूक करण्याची ही एक चांगली संधी आहे.

5/7

दरम्यान, आधीच IT, कंस्ट्रक्शन, टेलीकम्यूनिकेशन्स आणि ऊर्जा सेक्टरची जवळपास 3000 कंपनी या सौदी अरेबियामध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे दोन्ही देशांचे आर्थित रिश्ते मजबूत झाले आहेत. 

6/7

भारत सौदी अरेबियाचा दुसरा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. तर सौदी अरेबिया भारताचा चौथा आणि सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. 

7/7

अशात दिरियामध्ये भारतीय कंपन्यांना इन्वेस्ट केल्यानं दोन्ही देशांचा फायदा होणार आहे. त्यासाठी जवळपास 20 कंपन्यांचे CEO दिरियामध्ये एक मीटिंग करणार आहेत.