Valentine Day ला भाड्यावर मिळतात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड? कुठे आहे 'हे' ठिकाण?

तुम्हालाही विश्वास बसणार नाही पण Valentine Day च्या निमित्तानं 'या' ठिकाणी भाड्यावर मिळतात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड... 

Diksha Patil | Feb 11, 2025, 17:35 PM IST
1/7

व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कपल्स त्यांच्या पार्टनरसोबत त्यांच्या मनात असलेल्या भावना शेअर करताना दिसतात. हा संपूर्ण आठवडा हा लव्हर्सचा स्पेशल आहे. त्यातही, ज्यांचे पार्टनर नाहीत त्या सगळ्यांसाठी हा आठवडा काही खास नसतो. 

2/7

पण जर तुम्ही व्हॅलेन्टाईन वीकमध्ये सिंगल आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की या व्हॅलेन्टाईन डे ला तुम्ही भाड्यावर पार्टनर घेऊन येऊ शकतात. यावर तुमचा विश्वास बसणार आहे की नाही... तुम्हाला विश्वास बसत नसेल तर एक असा देश आहे जिथे भाड्यावर व्हॅलेन्टाईन डेला तुम्हाला पार्टनर भेटतो. 

3/7

सिंगल मुलं काही पैसे देऊन त्यांच्यासाठी भाड्यावर गर्लफ्रेंड घेऊन येऊ शकतात. तर मुली देखील काही पैसे देऊन भाड्यावर बॉयफ्रेंड मिळवू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला कोणत्याही कमिटमेंट शिवाय बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड मिळणार आहे. 

4/7

आता हे कुठे होतं हे आपण जाणून घेऊया. आपलेच शेजारी देश अर्थात चीन-जपान आणि व्हिएतनाममध्ये सिंगल लोकांसाठी ही सुविधा मिळू शकते. 

5/7

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हवे असल्यास किती पैसे खर्च करावे लागतील. चीनमध्ये 2018 मध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हायर करण्याचा ट्रेंड सुरु आहे. तेव्हा 20 मिनिटांच्या सर्विससाठी लोकांना 10 रुपये खर्च करावे लागतात. 

6/7

ही सर्विस शॉपिंग मॉलमध्ये देण्यात येते. 10 रुपयात गर्लफ्रेंडला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही. फक्त तुम्ही लांबून त्यांच्याशी बोलू शकतात. 

7/7

पॅकेज नुसार सर्विस

खरंतर, तुम्हाला गर्लफ्रेंडसोबत खाणं-पिणं, फिरायचं असेल, तर तुम्ही ते देखील करु शकतात. त्यासाठी एक वेगळा पॅकेज असतो. त्यानुसार, सर्विस घेऊन तुम्ही त्यांना त्यांच्या घरी देखील सोडू शकतात. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)