PHOTOS : शुभमन गिलने आई वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल
Shubhman Gill New Home : 13 जानेवारी रोजी देशभरात लोहारीचा सण साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत लोहरीचा सण साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले. याचे वेळी भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने सुद्धा आपल्या कुटुंबासोबत नवीन घरात लोहरीचा सण साजरा केला. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले.
Pooja Pawar
| Jan 15, 2025, 14:11 PM IST
1/7

शुभमन गिलने आपल्या आई वडिलांना नवीन घर भेटमध्ये दिलं. शुभमनचे वडील लखविंदर गिल यांचं मुलाच्या क्रिकेट करिअरमध्ये मोलाचे योगदान राहिलंय. मुलगा शुभमन याच्या क्रिकेट ट्रेनिंगसाठी त्याच्या वडिलांनी फाजिल्का येथील घर सोडले आणि ते मोहाली येथे शिफ्ट झाले होते. आई वडिलांच्या कष्टाचे फळ म्हणून क्रिकेटमध्ये यशस्वी होत असलेल्या शुभमनने त्यांना नवीन घर गिफ्ट केले.
2/7

3/7

4/7

शुभमन गिल नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर स्ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग होता. मात्र फलंदाजीत तो चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे काहीदिवस शुभमन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा होईल. यात शुभमन गिलची निवड होऊ शकते.
5/7

6/7
