Lucky Draw मध्ये 1 कोटींची कार जिंकला पण काही दिवसांत...; जगभरात हा 24 वर्षीय तरुण चर्चेत
1 crore Lamborghini Car Crash: एखाद्या लकी ड्रॉमध्ये अचानक आलिशान कार जिंकल्यानंतर त्याला आपण स्वप्नात आहोत की काय असा भास होऊ लगाला. आपल्याबरोबर जे घडतंय हे खरं आहे की खोटं असं त्याला वाटत होतं. मात्र त्याचं हे आलिशान कारचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांमध्येच ते भंगही पावलं. नेमकं घडलं काय आणि हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात...
1/5
![car accident](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563983-car-accident.jpg)
तेलं गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटणं ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. म्हणजे फार कष्ट करुन एखादी गोष्ट मिळवायची आणि मग ती गोष्टही गमावायची आणि आधी जे होतं तेही गमावायचं असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीबरोबर घडला आहे. ही व्यक्ती लकी ड्रॉमध्ये एक कोटी रुपये किंमत असणारी कार जिंकली. ही कार जगभरामध्ये चर्चेत असून एका लकी ड्रॉमध्ये तो ही जिंकल्याने तो जणू स्वप्नात असल्याप्रमाणेच वावरत होता. मात्र त्याचं हे स्वप्न अल्पावधीतच भंग पावलं.
2/5
![Car Accident](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563982-carwinman.jpg)
डेली रेकॉर्ड्स न्यूज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार स्कॉटलंडमधील फॉलकर्कमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय ग्रांट बर्नेट एका लकी ड्रॉचा विजेता ठरला. 10 रुपयांचं एक तिकीट असलेल्या महागड्या स्पर्धेमध्ये तो सहभागी झाला होता. मागील महिन्यामध्ये 14 जानेवारी रोजी त्याला विजेता घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्याने पहिलं प्राइज असलेल्या आलिशान गाडीवर शॅम्पेन उडवून आनंद साजरा केला होता.
3/5
![Car Accident](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563980-carwin.jpg)
ही स्पर्धा जिंकल्यानंतर ग्रांटला दोन पर्याय देण्यात आले होते. एक कोटी रुपयांची रक्कम घ्यावी किंवा तेवढ्याच किंमतीची कार असं ग्रांटला सांगण्यात आलं. त्याने लॅम्बॉर्गिनीची कार घेण्याचा निर्णय घेतला. ही कार फारच आकर्षक आणि महागडी होती. या कारबरोबरचे फोटो वगैरे स्थानिकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरले होते.
4/5
![Car Accident](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563976-car6.jpg)
5/5
![Car Accident](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/28/563975-car7.jpg)