तुमचा जोडीदार तुमच्यापासून दुरावला आहे की नाही? या टिप्सवर जाणून घ्या...

Relationship tips In Marathi : अनेकदा लग्नाच्या बोलणी सुरु झाल्या की काहीजणाच्या स्वभावात बदल होतो. तर काहीजण साखरपुडा झाल्यानंतरही स्वभावात बदल दिसून येतात. अशावेळी तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर तर जात नाही? हे जर ओळाखयचं असेल तर काही टिप्स फॉलो करा... 

Feb 20, 2024, 16:00 PM IST
1/7

लग्न म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात असते. पण लग्न करण्याचा निर्णय घेताना चूक झाली तरी भविष्यात तुम्हाला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. हे नाते प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे.   

2/7

अनेकदा तुमचा विवाह ठरवण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणे आवश्यक असते. ॲरेंज मॅरेजधूव जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोघेही एकमेकांसाठी अनओळखी असतात. त्यामुळे जोडीदाराला एकमेकांबद्दल काहीच माहिती नसते. खूप वेळ एकत्र घालवल्यानंतर त्यांना एकमेकांची ओळख होऊन नव्याने प्रेमात पडतात. 

3/7

अनेकदा जर तुमचा जोडीदार नात्यामध्ये खुश नसेल तर छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडू लागते. ही व्यक्ती अनेकदा लहान गोष्टींना मोठ्या गोष्टींमध्ये बदलण्याचा प्रयत्न करते. तुमच्या बाबतीत अशा घटना घडल्या तर तुम्हाला तुमचा निर्णय योग्य तो घ्यावा लागेल.

4/7

अशा कोणत्याही नातेसंबंधाच्या बाबतीत, अशी कोणतीही समस्या उद्भवल्यास आपल्या जोडीदाराशी चर्चा करणे आवश्यक आहे. जर समोरच्या व्यक्तीने तिचे वागणे बदलले नाही आणि लग्नानंतरही असेच वागणे सुरू ठेवले तर तुमचे जीवन तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे, अन्यथा तुम्ही तुमच्या निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.  

5/7

काहीवेळा जोडीदार तुम्हाला आवडत नसेल तर क्वचित प्रसंगी तो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो. जर एखाद्या व्यक्तीने काही कारणाने किंवा मजबुरीने तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तो तुमच्याशी उघडपणे बोलत नाही. तो त्यावर चर्चा करत नाही किंवा त्याला तुमच्यात काही रस नाही. 

6/7

एकत्र असाल तर एकमेकांसोबत कसा वेळ घालवतील याची योजना करतात. पण तुमच्या बाबतीत याच्या उलट घडत असेल, तुमचा पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर समजून घ्या की तुमचे लग्न जबरदस्तीने झाले आहे किंवा तुम्ही त्याची पहिली पसंती नाही.

7/7

अनेकदा असे मानले जाते की जेव्हा नाते नवीन असते, तेव्हा बरेच लोक एकमेकांना भेटण्याचा प्लॅन करतात. तुम्ही एकत्र जास्तीत जास्त वेळ कसा घालवायचा याची योजना करा, पण तुमचा जोडीदार तुम्हाला कोणतीही योजना बनवताना नेहमी नाकारत असेल तर याचा अर्थ काहीतरी चुकीचे आहे.