महाराष्ट्र आणि गोव्याच्या मधोमध असलेला छुपा समुद्र किनारा! फिरायला स्वस्त, निसर्गसौंदर्य मस्त

महाराष्ट्र आणि गोव्याच्या मधोमध असलेला हा छुपा समुद्र किनारा नेमका कुठे आहे?  

Jan 22, 2025, 23:27 PM IST

Terekhol Beach On Maharashtra Goa Border : गोव्यातील समुद्र किनाऱ्यांना आपल्या महाराष्ट्रातील सुंदर समुद्र किनारे टक्कर देतात. यामुळे गोव्याप्रामाणेच महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवरही पर्यटकांची गर्दी असते. मात्र, महाराष्ट्र आणि गोव्याच्या मधोमध एक छुपा समुद्र किनारा आहे. जाणून घेऊया या समुद्र किनाऱ्याविषयी.

1/7

महाराष्ट्र आणि गोवा ही दोन्ही राज्य एकमेकांच्या जवळच आहेत. या दोन राज्यांच्या मधोमध एक सुंदर समुद्र किनारा आहे. 

2/7

सावंतवाडी वरुन वेंगुर्ले, शिरोडा, रेडी असा प्रवास करता येतो. तर गोव्याहून बांदा मार्गे आरोंदा, रेडी असा प्रवास करता येतो.   

3/7

 रेडी फोर्ट, रेडीचे गणपती मंदिर, रेडी बीच आणि छोटसं मत्सालय पाही शकता. हे ठिकाण पर्यटकांच्या गर्दीपासून अलिप्त आहे.

4/7

या खाडीजवळच्या तेरेखोल हा छोटासा टापू आहे. येथेच रेडी नावाचा हा छुपा समुद्र किनारा आहे.   

5/7

गोवा आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर खाडी आहे. या खाडीमुळे दोन राज्यांत विभाजन झाले आहे.  

6/7

महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवर एक छुपा समुद्र किनारा आहे. येथे अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळते.   

7/7

गोवा हे सर्वात लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. आता महाराष्ट्राचा कोकण देखील गोव्याला टक्कर देत आहे.