कोणी 17 कोटींची साडी नेसली, तर कोणी लग्नासाठी 100 कोटींचा केला खर्च; 'या' दाक्षिणात्य स्टार्सचा झाला होता शाही विवाह
South Celebs Expensive Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या शाही लग्नासाठी कियारा आणि सिद्धार्थनं कोटींचा खर्च केला. आज आपण अशाच काही दाक्षिणात्य कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी लग्नात खूप खर्च केला होता.
1/5
![most expensive south celebrities wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/25/563341-ram-charan-upsana111.jpg)
2/5
![most expensive south celebrities wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/25/563340-brahmani-reddy-rajeev-reddy222.jpg)
ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डी - भाजप नेते जी जनार्दन रेड्डी यांनी लेक ब्राह्मणी हिचं लग्न राजीव रेड्डीसोबत मोठ्या थाटामाटात झाले. या लग्नाचे सगळे कार्यक्रम हे जवळपास 5 दिवस सुरु होते. इतकंच काय तर त्या लग्नात 50 हजारांहून अधिक पाहुणे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राह्मणीने चक्क 17 कोटी रुपयांची कांजीवरम साडी नेसली होती. इतकेच नाही तर तिच्या दागिन्यांची किंमत 90 कोटी रुपये होती. संपूर्ण लग्नात 550 कोटी रुपये खर्च झाले.
3/5
![most expensive south celebrities wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/25/563339-suriya-jyotika333.jpg)
4/5
![most expensive south celebrities wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/25/563338-jr-ntr-lakshmi444.jpg)
ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी - या यादीत पुढचे नाव साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे आणि त्याची पत्नी लक्ष्मी आहे. लक्ष्मी ही प्रसिद्ध उद्योगपती श्री नरणे श्रीनिवास राव यांची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लक्ष्मीची लग्नाच्या साडीची किंमत ही एक कोटी असल्याचे म्हटले जाते. इतकंच नाही तर लग्नमंडपासाठी 18 कोटी खर्च करण्यात आले होते. या लग्नात जवळपास 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
5/5
![most expensive south celebrities wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/25/563337-allu-arjun-sneha-reddy555.jpg)