लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या 'या' अभिनेत्रीचे झाले होते अपहरण; संजय दत्तसोबत केलंय मुख्य भूमिकेत काम

चित्रपटातील रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींविषयी प्रत्येकालाच आकर्षण वाटत असते. प्रेक्षकांच्या नजरेत नेहमी अभिनेत्रींची लोकप्रियता आणि प्रसिद्धी दिसत असते. मात्र, त्यांचे खाजगी आयुष्य हे पडद्यावरील त्यांच्या अभिनयापेक्षा खूपच वेगळे आणि अनपेक्षित असते. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी या चाहत्यांपासून  लपलेल्या आहेत. सिनेसृष्टीत अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया, जी आता चित्रपटसृष्टीपासून अलिप्त राहिली आहे. 

Feb 08, 2025, 16:13 PM IST

Bollywood Actress: चित्रपटातील रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींविषयी प्रत्येकालाच आकर्षण वाटत असते. प्रेक्षकांच्या नजरेत नेहमी अभिनेत्रींची लोकप्रियता आणि प्रसिद्धी दिसत असते. मात्र, त्यांचे खाजगी आयुष्य हे पडद्यावरील त्यांच्या अभिनयापेक्षा खूपच वेगळे आणि अनपेक्षित असते. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी या चाहत्यांपासून  लपलेल्या आहेत. सिनेसृष्टीत अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया, जी आता चित्रपटसृष्टीपासून अलिप्त राहिली आहे. 

 

1/7

चित्रपटसृष्टीत निर्माण केली स्वत:ची ओळख

वरील फोटोत दिसणाऱ्या या निरागस मुलीने बऱ्याच वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि आपली ओळख तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. परंतु, नशिबाचे फासे हवे तसे न पडल्याने काही वर्षांपूर्वी तिने बॉलिवूड सिनेसृष्टीला रामराम ठोकला.  

2/7

या मुलीने मोठे होऊन बऱ्याच हीट चित्रपटांमध्ये काम केले आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. चित्रपटांव्यतिरिक्त, ही अभिनेत्री एका नामांकित रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील झळकली होती. आता ही अभिनेत्री ग्लॅमरच्या जगापासून दूर असून परदेशात राहत आहे. एकेकाळी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती.  

3/7

कोण आहे ही अभिनेत्री?

फोटोमधील ही मुलगी दुसरी कोणी नाही तर कोएना मित्रा आहे. कोएना चित्रपटातील तिच्या डान्समुळे विशेष ओळखली जाते. संजय दत्त आणि अनिल कपूर यांच्या 'मुसाफिर' चित्रपटातील 'साकी साकी' या गाण्याने तिला एका रात्रीत स्टार बनवले आणि  त्यानंतर ती 'साकी-साकी गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली.   

4/7

तसेच, तिने 'एक खिलाड़ी एक हसीना', 'अपना सपना मनी मनी' यासारख्या चित्रपटात काम केले. काही वर्षांपर्यंत बॉलिवूडमध्ये आपला पाय रोवून उभी राहिल्यानंतर ती हळू-हळू बॉलिवूड सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि दक्षिणात्य चित्रपटातून तिने आपले नशीब आजमावले. मात्र, दक्षिणात्य सिनेसृष्टीत ती यश मिळवू शकली नाही.   

5/7

यश न मिळाल्याने इंडस्ट्रीपासून दूर

कोएनाने 2008 सालापर्यंत हिंदी चित्रपटात काम केले. बराच काळ चित्रपटसृष्टीतून गायब झाल्यानंतर ती 'बिग बॉस 13' मध्ये दिसली. तिने एका शोमध्ये सांगितले की तिच्यासाठी अभिनय कार्यक्षेत्रात ओळख निर्माण करणं सोपं नव्हतं कारण तिने आपल्या करिअरची सुरुवात लहान वयातच केली होती.  

6/7

एक्स बॉयफ्रेंडने केलं होतं अपहरण

एका शो दरम्यान तिने सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचे अपहरण केले होते. ती एका तुर्की मुलाला डेट करत असल्याचे तिने सांगितले होते. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर त्या मुलाचं वागणं बदललं. त्याने कोएनाला जबरदस्तीने आपल्याजवळच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिचे अपहरण करून बाथरूममध्ये कोंडून ठेवले आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता.  

7/7

आता काय करते कोएना मित्रा?

कोएनाचा प्रियकर जर लग्न केले नाही तर कोएना भारतात परत येऊ नये म्हणून तिचा पासपोर्ट जाळून टाकण्याच्या धमक्या देत होता. कोएना गेल्या कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर परदेशात राहत आहे. अभिनयापासून दूर राहून तिने तिचा वेगळा मार्ग निवडला. आता ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करते.