MG ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, टाटाला देते टक्कर!

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला 10 लाखांच्या आतील सर्वात स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Feb 08, 2025, 15:56 PM IST
1/7

10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारी MG Windsor EV ही कार टाटा मोटर्सच्या Punch EV शी स्पर्धा करते. 

2/7

MG Baas प्रोग्रामसह ही इलेक्ट्रिक कार 9.99 लाख रुपयांच्या एक्स शोरुम किमतीत खरेदी करता येईल. 

3/7

MG Baas प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला या कारमध्ये बॅटरी भाड्याने प्रति किलोमीटर 3.5 रुपये द्यावे लागतील. 

4/7

जर तुम्ही बॅटरीची पू्र्ण किंमत देऊन कार खरेदी केली तर तुम्हाला ही कार 13.99 ते 15.99 (एक्स शोरुम) लाख रुपयांना मिळेल. 

5/7

MG Windsor EV या कारमध्ये 38 किलोवॅट क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी एका चार्जवर 331 किमी पर्यंतचे अंतर पार करू शकते.

6/7

टाटा मोटर्सच्या या इलेक्ट्रिक कारची किंमत 9.99 ते 14.44 लाख रुपये (एक्स शोरुम) पर्यंत आहे.

7/7

टाटाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, टाटा पंच EV कार 10 लाख रुपयांपेक्षा स्वस्त असून ती एका चार्जमध्ये 365 किमी पर्यंत अंतर पार करू शकते.