पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे 'हे' 7 क्रिकेटपटू नव्हते मुस्लिम, एकाने स्वीकारला होता इस्लाम धर्म

Pakistan Non Muslims Players: या क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया जे मुस्लिम नव्हते, तरीही पाकिस्तानसाठी मनापासून क्रिकेट खेळले.   

तेजश्री गायकवाड | Feb 08, 2025, 14:11 PM IST

Pakistan Non Muslims Players: या क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया जे मुस्लिम नव्हते, तरीही पाकिस्तानसाठी मनापासून क्रिकेट खेळले. 

 

1/8

Pakistan Non Muslims Players: पाकिस्तान हा मुस्लिम देश असून पाकिस्तानच्या क्रिकेट संघात नॉन मुस्लिम खेळाडूंशी भेदभाव केला जात होता. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे दानिश कनेरिया. दानिश कनेरियाला पाकिस्तान क्रिकेट संघात वाईट वागणूक मिळाली कारण तो हिंदू होता. याचा खुलासा खुद्द दानिश कनेरियाने केला आहे. याशिवाय अशा क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया जे मुस्लिम नव्हते, तरीही पाकिस्तानसाठी मनापासून क्रिकेट खेळले.

2/8

दानिश कनेरिया

दानिश कनेरिया हा पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळणारा शेवटचा नॉन मुस्लिम खेळाडू होता. कनेरियाने 2000 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळले ज्यात त्याचा खेळ खूप यशस्वी ठरला. नंतर फिक्सिंगमध्ये नाव आल्याने कनेरियाला पाकिस्तान संघातून वगळण्यात आले होते.

3/8

जोसेफ योहाना

सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या युसूफ योहानाने पाकिस्तानी संघासाठी तब्ब्ल 90 कसोटी सामने खेळले आहेत. युसूफने 1998 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघात नॉन-मुस्लिम खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. युसूफ योहाना हा ख्रिश्चन होता, पण 2004 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याचे नाव बदलून मोहम्मद युसूफ ठेवले.  

4/8

अनिल दलपत सोनवारिया

पाकिस्तानकडून खेळलेला माजी यष्टिरक्षक अनिल दलपत सोनवारिया हा दानिश कनेरियाचा चुलत भाऊ आहे. अनिल दलपत पाकिस्तान क्रिकेट संघासाठी पहिला हिंदू खेळाडू म्हणून खेळला.  अनिल दलपत यांनी 1984 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून करिअरला सुरुवात केली.

5/8

अँटोन डिसोझा

ख्रिश्चन धर्माचे असलेले अँटोन डिसोझा यांनी 1959 मध्ये पाकिस्तानकडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. डिसोझाचे वडील 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले होते. त्याने पाकिस्तानसाठी सहा कसोटी खेळल्या, ज्यात त्याने १७ विकेट घेतल्या.

6/8

डंकन शार्प

ख्रिश्चन असलेल्या डंकन शार्पने 1959 मध्ये पाकिस्तानकडून खेळण्यास सुरुवात केली.  अँग्लो-पाकिस्तानी डंकन  शार्पने पाकिस्तानसाठी फक्त तीन कसोटी सामने खेळले आणि 22.33 च्या सरासरीने 134 धावा केल्या.

7/8

वॉलिस मॅथिस

वॉलिस मॅथियास या ख्रिश्चन यांनी 1974 मध्ये पाकिस्तानकडून करिअरला सुरुवात केली होती.  मॅथिएझने पाकिस्तानसाठी 21 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 783 धावा केल्या. वॉलिस मॅथियास हा पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळणारा पहिला नॉन-मुस्लिम खेळाडू होता.

8/8

सोहेल फजल

ख्रिश्चन धर्माचा सोहेल फजल पाकिस्तानकडून दोन एकदिवसीय सामने खेळला. 1989-90 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात, सोहेल फजलने तीन गगनाला भिडणारे षटकार ठोकले आणि संघाची धावसंख्या 250 च्या पुढे नेली.