Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : 7 मे 1861 मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकात्यातील जोडासांको इथं रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला होता. साहित्यिक आणि क्रांतिकारक म्हणून नावाजलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांनी कायमच अनेक पिढ्यांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. पाहूया त्यांचे असेच काही विचार...   

May 07, 2024, 09:19 AM IST

Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : भारतीय साहित्य जगतामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या आणि  'जन गण मन' हे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती. 

1/10

आशावाद

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'मी एक आशावादी व्यक्ती आहे. मी ध्येय्यापर्यंत एका दारानं पोहोचू शकलो नाही, तर दुसऱ्या दाराचा वापर करेन अथवा एक नवा दरवाजा तयार करेन.'  

2/10

सत्य

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'तथ्य कैक आहेत. पण, सत्य एकच आहे. तुम्हीही सर्व चुकांसाठी दारं बंद केलात तर, सत्य बाहेर येईलच.'  

3/10

बळ

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'अडचणी येऊ नयेत अशी प्रार्थनाच आपण केली नाही पाहिजे. त्यापेक्षा त्यांचा सामना न डगमगता करता यावा यासाठीचं बळ मिळावं अशी प्रार्थना केली पाहिजे.'

4/10

वास्तव

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'नदीकाठी उभं राहून, पाणी पाहून तुम्ही ती ओलांडू शतच नाही. त्यासाठी तुम्हाला पाण्यात उतरावं लागेल.'

5/10

सत्य

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'भांड्यातलं पाणी चकाकतं, समुद्रातील पाणी मात्र धुसर वाटतं. अगदी तसंच लहानसं सत्य उघडपणे सांगता येतं. पण, महान सत्य मात्र कायमच मौन राहतं.'

6/10

वर्तमान

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'वर्तमान कितीही अंधारमय असलं तरीही, प्रयत्न केल्यास हाती काहीतरी चांगलं निश्चितच लागेल.'  

7/10

प्रेम

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'प्रेम कोणावरही का असेना, ते कधीच अधिकाराचा दावा करत नाही. कारण, प्रेम स्वातंत्र्य देतं.'  

8/10

आव्हानं

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'ज्या ज्या आव्हानांपासून तुम्ही दूर जाता, त्या पुढं जाऊन तुमची शांतताच हिरावतात.'

9/10

अधिकार

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'जे आपलं आहे ते स्वत:हून आपल्यापर्यंत येईल, पण केव्हा? जेव्हा तुम्ही त्यास पात्र असाल.'  

10/10

आस्था

Rabindranath Tagore Jayanti 2024 inspirational Quotes in marathi

'आस्था, धारणा एक पक्षी आहे... एक असा पक्षी जो रात्रीच्या अंधारातही दिवसाचा उजेड अनुभवू शकतो.'