पुण्यात ऐन दिवाळीत प्रीपेड रिक्षा बंद, वाहतूक पोलीस याला कसे जबाबदार?

 पुणे रेल्वे स्थानकावरील प्रीपेड रिक्षा भूथ शुक्रवारी सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे गैरसोय होत आहे. 

| Nov 02, 2024, 11:01 AM IST

 बूथ वरील रिक्षांचे करार संपल्यामुळे पुण्यातील प्रीपेड रिक्षा बंद झाल्या आहेत. ऐन दिवाळीत हे झाल्यामुळे पुणेकरांना त्रास होऊ लागला आहे.  

1/9

वाहतूक पोलिसांकडून नूतनीकरण न झाल्याने प्रीपेड रिक्षा सेवा बंद करण्यात आली आहे. 

2/9

या सगळ्याचा फटका सामान्यांवर होत आहे.  ऐन दिवाळी सणाच्यावेळी प्रीपेड रिक्षा बंद झाल्यामुळे रिक्षाचालक नागरिकांची लुटमार करत आहेत. 

3/9

या प्रकाराला रिक्षामित्र प्रीपेड रिक्षा बूथच्या माध्यमातून चाप बसला होता.   

4/9

पण आता बूथ चालविणाऱ्या रिक्षा मित्रच्या कराराचे नुतनीकरण झाल्यामुळे नागरिकांवर अशी वेळ आली आहे. वाहतूक पोलिसांनी नुतनीकरण न होण्यामागे आचारसंहितेचे कारण असल्याचे समजते. 

5/9

प्रवासी सेवा संघासोबत बूथ चालविण्यासाठी रिक्षामित्रने केलेले करार 22 ऑक्टोबरला संपुष्टात आला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून हा बूथ बंद करण्यात आला.

6/9

गेल्या 100 दिवसांत आत्तापर्यंत अंदाजे 28 हजार प्रवाशांनी बूथचा लाभ वापर केला.  प्रवासी सेवा संघाने रिक्षा मित्रसोबत हा करार केला होता. या संघाचे अध्यक्षपद वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तांकडे आहे.  

7/9

पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालक प्रवाशांची लूट करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येतात. प्रीपेड रिक्षा बूथ सुरू झाल्यानंतर या तक्रारी कमी झाल्या होत्या. 

8/9

आता पुन्हा प्रवाशांकडून जास्त भाडे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ऐन दिवाळीत रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या वाढते. 

9/9

याच काळात बूथ बंद झाल्याने काही रिक्षाचालक मनमानी भाडे सांगत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जात असल्याची तक्रारही प्रवासी करीत आहेत.