दीप-वीर लग्नासाठी इटलीला रवाना
पाहा हे खास फोटो
Dakshata Thasale
| Nov 10, 2018, 17:51 PM IST
मुंबई : 14 आणि 15 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणारे दीपिका पदुकोण - रणवीर सिंह इटलीला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री हे दोघं आपल्या कुटुंबियांसोबत इटलीला रवाना झाले. यावेळी या दोघांनी देखील शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले होते. लग्नबंधनात अडकण्याअगोदर दोघांनी देखील फोटो काढले. इटलीतील लेक कोमो येथे हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.